वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टारचा महिलेचा दुर्दैवी शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवलं, पंढर
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रील स्टार अशी ओळख असणाऱ्या महिलेचा मृतदेह (Pandharpur Crime News) कालव्यात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील सोनाली जाधव या रीलस्टारची अनैतिक संबंधातून तिला संपवल्याचे समोर आले आहे. सोनाली जाधव हिचा विवाह झाला होता. मात्र ती सध्या तिच्या माहेरी भोसे येत राहत होती.(Pandharpur Crime News)
Pandharpur Crime News: प्रियकराने सोनाली वर चारित्र्याचा संशय घेऊन…
भोसे येथे राहत असताना गावातील तुकाराम गावंधरे यांच्याशी तिचे प्रेम संबंध जुळून आले. मात्र प्रियकराने सोनाली वर चारित्र्याचा संशय घेऊन ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. सोन्याचे दागिन्यावरून झालेल्या वादात सोनालीचा गळा दाबला. यानंतर बेशुद्ध अवस्थेतील सोनालीला कालव्यात फेकून दिल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती असून पुढील तपास सुरू आहे.(Pandharpur Crime News)
Pandharpur Crime News: आपल्या माहेरी भोसे येथे राहायला
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली पतीपासून विभक्त राहत होती, ती आपल्या माहेरी भोसे येथे राहायला आली होती. याच दरम्यान तिचे गावातीलच तुकाराम गावंधरे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. मात्र, प्रियकराने सोनाली वर चारित्र्याचा संशय घेऊन तिला संपवले असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. दोन दिवस सोनाली घरी न आल्याने तिच्या वडिलांनी करकंब पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दोन दिवसांनंतर रोपळे परिसरातील कालव्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मयत सोनालीच्या वडिलांनी हा मृतदेह सोनालीचाच असल्याची ओळख पटवली.(Pandharpur Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.