एसीपी अजित वाघ यांचे निधन
सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अजित अनंत वाघ यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. नागपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना अजित वाघ यांनी अंडरवर्ल्ड डॉन अमर नाईक चकमकीत भाग घेतला होता.
अजित वाघ यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना स्थानिक तरुणांची ईगल ब्रिगेड स्थापन केली होती. त्यांच्या मदतीने त्यांनी अनेक गुन्हय़ांचा छडा लावला होता. गुन्हेगारीवर नियंत्रण आणले होते. एक समाजोपयोगी पोलीस अधिकारी अशीही अजित वाघ यांची नागरिकांमध्ये प्रतिमा होती. अजित वाघ यांच्यावर सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Comments are closed.