सिंहगड इन्स्टिटय़ूटच्या वैद्यकीय महाविद्यालयातील त्रुटींवर हायकोर्टाचे ताशेरे
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातील अनागोंदी कारभाराबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज तीव्र नाराजी व्यक्त केली. महाविद्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून विद्यार्थ्यांचे आधीच मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. प्रत्येक दिवस विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असून त्यांना आणखी अंधारात ठेवता येणार नाही, इतकेच काय तर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान खपवून घेणार नाही, अशा शब्दांत हायकोर्टाने प्रशासनाला धारेवर धरले.
Comments are closed.