संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तरुणींची छेडछाड, दोन वन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या दोन तरुणींचा पाठलाग करून त्यांच्याशी अशोभनीय वर्तन केल्याच्या आरोपावरून दोन वन कर्मचाऱ्यांविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही कर्मचारी छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत आहेत.

26 नोव्हेंबरला दुपारी दीड वाजण्याच्या  सुमारास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॉय ट्रेनसमोरील तलावाजवळ ही घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेले आणि उद्यानात फिरण्यासाठी आलेले उमेश व प्रभू यांनी फिर्यादी तरुणी आणि तिच्या मैत्रिणीचा पाठलाग केला. तसेच त्यांच्या सोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

Comments are closed.