नसरापूर प्रकरणी रितेश देशमुखचा संताप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षेची आठवण
नसरापूर प्रकरणी रितेश देशमुखची प्रतिक्रिया पुण्यातील भोर तालु्क्यातील नसरापूर (Narsapur) येथे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त केला जात आहे. एका 65 वर्षाच्या नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. यानंतर त्यानं चिमुरडीची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना उघडकीस येताच सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे. या संतप्त घटनेविरोधात अभिनेता रितेश देशमुखनेही तीव्र संताप व्यक्त केला. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याचा आगामी ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) सिनेमामुळे चर्चेत आहे. आज तो पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनासाठी गेला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना नसरापूर प्रकरणावर त्यानं प्रतिक्रिया दिली. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
नसरापूर प्रकरणावर रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला? (Riteish Deshmukh reaction on Nasrapur)
माध्यमांशी संवाद साधताना रितेश देशमुखने नसरापूर प्रकरणी संताप व्यक्त केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शिक्षेचा संर्दभ देत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील चौरंग करण्याच्या शिक्षेची आज आठवण झाली. आपल्या राज्यात किंवा देशात अशा गोष्टी घडतात, तेव्हा खरंच खूप राग येतो. एवढा राग येतो की, आपल्या हातात गोष्टी असूनही, आपण काहीच करु शकत नाही’.
‘नसरापूर प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा’ – रितेश देशमुख (Riteish Deshmukh expresses anger over the shocking Nasrapur crime)
‘आपण फक्त एवढीच इच्छा व्यक्त करू शकतो की, सरकार, पोलीस आणि कोर्टाने या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आरोपीवर कठोर कारवाई करणं, अतिशय गरजेचं आहे. कारवाई केली तर, भीती आणि दरारा कायम अशा व्यक्तींच्या मनात राहेल, जे असे कृत्य करण्याचा विचार करतात’, असं रितेश देशमुख म्हणाला. ‘अशा गोष्टी घडतात तेव्हा वाईट वाटतं, धक्का बसतो. जनआक्रोश होणं हे साहजिकच आहे. फास्टट्रॅकवर निर्णय घेतला की, लोकांमध्ये नक्कीच याचा दबदबा राहेल, असं मला वाटतं ‘, असंही रितेश देशमुख म्हणाला.
‘पूर्वीचे घेतले जाणारे निर्णय, शिक्षा वेगळे होते. तो काळ आणि हा काळ वेगळा आहे, हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. आताचे नियम वेगळे आहेत. आपला संविधान आहे. जे काही आहे, नियमात राहून करावं लागतं. आपल्याकडे नियम आहेत. पण मला असं वाटतं की, अशा प्रकरणात जेवढ्या लवकरात लवकर निर्णय घेण्यात येतात, तेवढे बरे असतात’, असंही रितेश देशमुख म्हणाला.
आणखी वाचा
Comments are closed.