रोहित जैन यांची RBI डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने रोहित जैन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) उप-गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जैन यांची नियुक्ती 3 मे पासून प्रभावी होईल. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. ते सध्या आरबीआयमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. रोहित जैन हे टी. रवी शंकर यांची जागा घेणार आहेत. जैन हे गेल्या महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त झाले आहेत. उप-गव्हर्नर म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मध्यवर्ती बँक चलनविषयक व्यवस्थापन आणि वित्तीय प्रणालीच्या स्थिरतेवर लक्ष केंद्रित करत असताना रोहित जैन यांची झालेली नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
Comments are closed.