बिघडलेले विमान अजितदादांना दिले का? एफआयआर का घेत नाही? क्रिमिनल अँगल का तपासला जात नाही? रोहित

बारामती: बारामतीत शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आणि बारामती पोलिस स्टेशनमध्ये (Baramati Police Station) पोलिसांसोबत वादावादी झाल्याची माहिती आहे. काल (बुधवारी, ता २५) मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात देखील रोहित पवारांची (Rohit Pawar) पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती, तर आज देखील बारामती पोलिस रोहित पवारांची तक्रार घेतील पण त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला असल्याची माहिती आहे. पोलिस रोहित पवारांची एफआयआर दाखल करून घेत नसल्याने रोहित पवार आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. दोन तास पोलिस स्टेशनमध्ये बसून देखील एफआयआर न घेतल्याने रोहित पवारांनी संताप व्यक्त केला, त्यानंतर आता माध्यामांशी त्यांनी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी डीजीसीए यांच्याकडून एक रिपोर्ट आलेला आपण सगळ्यांनी बघितला. हा रिपोर्ट आहे 24 फेब्रुवारीचा, तो रिपोर्ट आल्यानंतर कालच्या दिवशी मी आणि काही आमदार सर्वपक्षी आमदार, काही पदाधिकारी आणि सामान्य लोक मिळून मुंबईमध्ये असलेल्या मंत्रालयाच्या जवळ पोलीस स्टेशन आहे, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे आम्ही गेलो, आणि इच्छा व्यक्त केली, अजितदादांचा अपघात किंवा घात आहे, 28 जानेवारीला त्याबद्दल डीजीसीएनए जो रिपोर्ट दिला आहे, त्यामध्ये व्हीएसआर कंपनीकडून काही निष्काळजीपणा झालेला आहे, त्यामुळे हा अपघात झाला आहे, असा कुठेतरी सिद्ध होतं, त्यामुळे याच्या बेसिसवर एफआयआर व्हावा यासाठी आम्ही काल मुंबईला गेलो होतो, असं रोहित पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.

तर पुढे रोहित पवार म्हणाले की, आता यामध्ये काही लोकांनी शंका व्यक्त केली आहेत, यामध्ये शंका काय आहेत तर मी मुंबईला एफआयआर करू शकतो का, बीएनएसएस जो 2023 ला कायदा आलेला आहे, झिरो कॉन्सेप्ट म्हणजेच तुम्ही कुठेही एफआयआर करू शकता आणि तो कुठेही ट्रान्सफर करता येतो. आम्ही मुंबईमध्ये एफआयआर करण्याचं कारण फक्त एवढेच आहे, की तिथे जर आपण एफआयआर केला असता तर आज आपल्याला दुर्दैवाने इथे येऊन एफआयआर करावा लागत आहे, इथे गर्दी मोठ्या प्रमाणावर होईल, म्हणून मी इथे न येता मुंबईत एफआयआर करता येतोय का याचा प्रयत्न मी तिथे केला, मुंबईत एफआयआर होऊ शकला असता पण तिथे त्यांनी तो स्वीकारला नाही, त्याबरोबर आपल्याला एफआयआर करण्याचा अधिकार आहे का? तर अंडर सेक्शन १७३ (१) याच्या अंतर्गत देशातील कुठल्याही नागरिकाला एफआयआर करण्याचा अधिकार शंभर टक्के आहे, याच्यात हा अधिकार कसा दिला गेला तर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका होती, त्या याचिकेचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, एफआयआर करण्याचा अधिकार हा सर्वांचा आहे, तुमच्यापैकी कोणीही असुदे, महाराष्ट्रातले असू दे, नाहीतर बारामतीतील, कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांनी जर ठरवलं असतं दादांच्या बाबतीत एफआयआर व्हावा तो 100% करायला पाहिजे आणि तो पोलिसांनी स्वीकारला पाहिजे असा अधिकार आपल्या सर्वांना आहे, असंही यावेळी रोहित पवारांनी म्हटलं.

यामध्ये व्हीएसआर जबाबदार आहे

24, 25 तारखेपर्यंत आपण का थांबलो? याआधी 28 तारखेला ही घटना घडली, 30, 31 तारखेला सुद्धा आपण एफआयआर करू शकलो असतो, पण आपण थांबलो. तुम्ही थांबला, आम्ही थांबलो, सगळे थांबले, खोलात जाऊ द्या, काय होतंय ते आपल्याला समजू द्या, पण जेव्हा 24 तारखेला सांगितलं, व्हीएसआर कंपनीकडून काही गोष्टी या पालन ​​न करण्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे झालेल्या आहेत, यामध्ये व्हीएसआर जबाबदार आहे, दादा ज्या विमानाने गेलेले ते होते लेयर जेट 45 एक्स आर हे विमान या व्हीएसआर कंपनीकडे आहेत, अशा प्रकारचे सात विमान कंपनीकडे होते, त्यातील एकातून दादा प्रवास करत होते, त्याची दुर्घटना तिथे घडली. 2023 ला मुंबईमध्ये एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं आता राहिले पाच, आणि डीजेसीएच्या 24 तारखेच्या आदेशाप्रमाणे पाचच्या पाच राहिलेले विमान हे तुम्ही उडू शकत नाही असं सांगितलं, कुठेतरी गोष्टींचे पालन न करणे हे देखील होतं. ते डीजीसीएने मान्य केलं, मग मला पडलेला प्रश्न आहे की, आज व्हीएसआरकडे असणारी पाच विमान तुम्ही थांबवता, बंद ठेवता मग अजित दादांना खराब विमान का दिला गेला? ते चुकून दिलं की ते मुद्दाम दिलं? याबाबतचा एफ फायर करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

एफआयआर कोणाच्या विरोधात आहे

हा एफआयआर कोणाच्या विरोधात आहे तर हा एफआयआर व्हीएसआर कंपनीच्या विरोधात आहे. त्यांच्या मालकाच्या विरोधात आहे. त्याचबरोबर विमान उडू शकत नाही, उडू शकत हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे, ती डीजीसीएची असते, मग तिथे कोण असे अधिकारी होते, अजित दादाच्या विमानातून प्रवास करत होते, ते विमान चांगलं आहे, चांगल्या कंडीशन मध्ये आहे, हे कोणी सांगितलं, हे कोण अधिकारी आहेत, त्यावर कोणी सह्या केल्या, या अधिकाऱ्यांना शोधा असा दुसरा एफआयआर करण्यासाठी आम्ही आलो होतो. अजित दादांनी कोणत्या विमानाने जावं कोणत्या विमानात बसावं ते विमान उडवायचं की नाही वातावरण बरं आहे की नाही हे बघण्याचं आणि विमान नियोजन करण्याची जबाबदारी ही अॅरो नावाच्या कंपनीवर आहे, त्यांचा जो प्रायव्हेट व्हाट्सअप चॅट आहे, तो मी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून लोकांसमोर आणला, त्यामध्ये एक पवार नावाचा अधिकार आहे, अॅरो नावाच्या कंपनीचा, त्याने सांगितलं वेदर चेक आहे आणि ओके आहे, दादांनी प्रवास केला तरी चालेल आणि ती गोष्ट बघितल्यानंतर दादांच्या पीएनए त्यांना सांगितल्यानंतर दादा सात वाजता गाडीत बसले आणि विमानतळावर पोहोचले मग ही अॅरो नावाची जी कंपनी आहे याच्यावर एफआयआर करा असेही आम्ही सांगितलं आहे, या सर्व गोष्टींवर लक्ष देणारे काही अधिकारी आहेत, ते अधिकारी त्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये होते, त्याच्यात मध्ये होते, तुम्हाला राज्य शासन पगार देत असेल तर एखादा व्हीआयपी ट्रॅव्हल करत असताना तो सुखरूप आहे की नाही ते विमान योग्य आहे की नाही हे बघण्याचा अधिकार त्या अधिकाराचा असताना त्यांनी दुर्लक्ष केलं त्या दुर्लक्षामुळे दादांनी तो प्रवास केला आणि ती दुर्घटना घडली मग त्या ग्रुपमध्ये असतील ते सर्व अधिकारी यांच्यावर एफआयआर करा अशी मागणी मी केली आहे असंही रोहित पवारांनी सांगितलं.

व्हीएसआर कंपनीचं नातं असेल तर त्या मंत्राला पदावर राहण्याचा राहण्याचा अधिकार नाही

यामध्ये मी कोणताही नाव घेतलं नाही, या देशाचे जे केंद्रीय उड्डाण मंत्री आहेत, ज्यांचा राजीनामा मी मागतो आहे, ज्या ज्या पार्टीतून ते येतात आणि व्ही एस आर कंपनीचा डायरेक्ट तिथे कमर्शियल रिलेशनशिप आहे, आर्थिक व्यवहार आहे, आर्थिक व्यवहार असणारा जर एखादा पक्ष असेल, त्याच्या जवळची एखादी कंपनी असेल त्या कंपनीचा आणि व्हीएसआर कंपनीचं नातं असेल तर त्या मंत्राला पदावर राहण्याचा राहण्याचा अधिकार नाही, असं मी बोललो होतो, लोकांची ही इच्छा आहे, पण या एफआयआरमध्ये आम्ही त्या मंत्राचं नाव घेतलंय का? तर नाही घेतलं कारण आम्हाला राजकारण करायचं नाही आणि यामध्ये फक्त पोलिसांना एवढेच सांगितलं एफआयआर व्हावा, आमचा नागरिक म्हणून हक्क आहे, परिवार म्हणून हक्क आहे, तो तुम्ही स्वीकारावा, त्यांना तो स्वीकारावाच लागतो, कारण तो सर्वांना अधिकार आहे, गेले दोन तास आम्ही चर्चा करत आहोत, त्यांनी आम्हाला सांगितलं, करता येणार नाही, कारण अपघात रिपोर्ट हा फाईल झाला आहे, असंही पुढे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

FIR का घेतला जात नाही ?

काही वर्षापूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केली की काय, तो गेला हे सगळं दुर्दैवी होतं. तो मुंबईत रहात होता, पण तो काही महाराष्ट्राचा नव्हता. पण तरीही त्याच्या मृत्यूच्या मुद्यावरून एवढं रान उठवण्यात आलं, चौकशीची मागणी झाली. मग अजित दादा हे तर महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मग त्यांच्या सारख्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावरही एफआयआर का घेतला जात नाही? त्यांना न्याय का मिळत नाही ? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. त्यांच्या मृत्यूला महीना होत आलाय, तरी इतक्या दिवसात काहीच का झालं नाही ? या इन्व्हेस्टिगेशनवर कोणाचा तरी दबाव असल्यामुळेच हा तपास योग्य दिशेन जात नाहीय़े, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.

Comments are closed.