तिकडे रोहित पवार राष्ट्रवादीची फौज घेऊन बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले, इकडे मुंबई पोलिसांचा FIR

मुंबई पोलिसांसाठी रोहित पवार: अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी नागरी उड्डाण संचलनालय अर्थात डीजीसीए आणि व्हीएसआर विमान कंपनीविरोधात तक्रार दाखल  करण्यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) प्रचंड आक्रमक झाले आहेत. काल ते याप्रकरणी मुंबईच्या मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marinedrive Police) गुन्हा नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत FIR दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. यावरुन  रोहित पवार आणि पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्यात शा‍ब्दिक वादही झाला होता. या सगळ्या घडामोडींनंतर आता मुंबईच्या मरिनड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवार यांच्या तक्रारीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Politics news)

मुंबईच्या मरीनड्राईव्ह पोलिसांकडे रोहित पवार यांनी काल दाखल केलेला अर्ज पुढील तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे मरीनड्राईव्ह पोलिसांनी वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वये शाखा, पुणे SIT करत असल्याने रोहित पवार यांनी दाखल केलेला अर्ज पुढे SITकडे काल वर्ग करण्यात आल्याचे समजते. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाप्रकरणी व्हिएसआर आणि डीजीसीए यांच्यावर आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीतून रोहित पवार यांनी मरीनड्राईव्ह पोलिसांकडे केली होती. त्यावर मरीनड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवार यांना पत्र देत या प्रकरणाचा तपास SITकरत असल्याने त्यांच्याही तक्रार अर्ज पुढे वर्ग केल्याची माहिती कळवली आहे.

दरम्यान, आज रोहित पवार आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे नागरी उड्डाण संचलनालय अर्थात डीजीसीए आणि व्हीएसआर विमान कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. या दोघांसोबत पोलीस ठाण्याच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर आले आहेत. तसेच स्थानिक वकिलांची फौजही रोहित आणि युगेंद्र पवार यांच्यासोबत आहे.  मात्र, याठिकाणीही पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली जाऊ शकते. पोलीस तक्रार घेतील पण गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता रोहित पवार काय करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Baramati news: बारामती पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी

अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणात डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे, तसा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे बारामतीमधील स्थानिक वकिलांचे म्हणणे आहे. रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. त्यांनी बारामती पोलीस ठाण्याचा परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला. ‘गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकारण इतकं खराब केलंय की, माणसात माणूस ठेवला नाही. बारामतीच्या देहातला आत्मा निघून गेलाय, आमच्या देवाला अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.

आणखी वाचा

मुंबईत पोलिसांनी उडवून लावलं, रोहित पवार-युगेंद्र पवार वकिलांची अख्खी फौज घेऊनच बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले PHOTOs

रोहित पवार पोलीस स्टेशनला असताना एका वजनदार व्यक्तीचा फोन आला अन् डीसीपी मुंढेंची वागणूक बदलली: संजय राऊत

आणखी वाचा

Comments are closed.