सिडको जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होणार, सरकारकडून SIT ची स्थापना, रोहित पवारांकडून स्वागत

रोहित पवार: राज्यातील सरकारी वनजमिनी बळकवल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे सिडको जमीन घोटाळ्यात महत्वपूर्ण पाऊल असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी पाठपुरावा करणारे स्थानिक भूमिपुत्र तसेच कॉन्शियस सिटीझन फोरम यांसारख्या सामाजिक संघटनांचे हे यश असून सर्वांचेच रोहित पवारांनी अभिनंदन केले आहे.

नवी मुंबईतील सिडकोकडून 5 हजार कोटी रुपयांच्या वनजमीन घोटाळा प्रकरणाची देखील एसआयटीकडून चौकशी होणार आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडून मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांची भेट घेतल्यानंतर तत्काळ राज्य सरकारच्या वन विभागाकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

आम्ही कोणत्याही भ्रष्ट माशाला या प्रकरणातून सुटू देणार नाही

आम्ही सादर केलेले तब्बल 12 हजार पानांचे पुरावे, सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशी करण्याबाबतचं लिहिलेलं पत्र आणि आता राज्य सरकारने SIT स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय अशाप्रकारे चोहोबाजूने मजबूत सापळा लागत आहे. परंतु मागील काळात वेगवेगळ्या प्रकरणात स्थापन झालेल्या SIT चा इतिहास बघता केवळ वेळ मारुन नेण्याचे प्रकार झाले आहेत. मात्र या प्रकरणात भ्रष्टाचारी मंत्र्याला कितीही संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही कोणत्याही भ्रष्ट माशाला या प्रकरणातून सुटू देणार नाही .

भ्रष्टाचारी मंत्र्यांची गय केली जाणार नाही हे मुख्यमंत्री दाखवून देतील का?

आरोपी नंबर 2 बिवलकर महाराष्ट्रातच असून लवकरच देश सोडणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं बिवलकर देशाबाहेर पळून जाण्यापूर्वी लुकआउट नोटीस देऊन अटक करणे गरजेचं आहे. आम्ही एवढी स्पष्ट माहिती देऊनही उद्या बिवलकर देशाबाहेर गेल्यास राज्याचे मुख्यमंत्री त्यासाठी पूर्णपणे जबाबदार असतील असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राज्याला ओरबाडून खाणाऱ्या या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घेऊन भ्रष्टाचारी मंत्र्यांची गय केली जाणार नाही हे मुख्यमंत्री दाखवून देतील का? की अशा भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालून पुन्हा राज्याला लुटायला मोकळं सोडतील? असा सवाल रोहित पवार यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची महाराष्ट्र वाट बघत आहे. असो, काहीही झालं तरी हा विषय आपण मार्गी लावणारच, त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी आणि कुळधारकांनी कुठलीही काळजी करू नये असे रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Rohit Pawar on Maratha Reservation GR : सर्वांना मान्य असणारा GR काढला तर ओबीसींचा वाद का? रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, छगन भुजबळांना…

आणखी वाचा

Comments are closed.