आम्हीही जिद्दी, आता माघार नाही, रोहित पवारांचं विधान; अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस, प्रशास
Rohit Pawar Protest Pandharpur: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कालपासून (12 जून) पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, आम्हीही जिद्दी आहोत. जोपर्यंत कर्जमाफीमधील जाचकाठी निघत नाही आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी एबीपी माझाशी बोलताना दिला. (Rohit Pawar Protest Pandharpur)
पंढरपुरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या ‘अन्नत्याग’ आंदोलनावळी पंढरपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वतः मध्यस्थी करत असून, त्यांनी आंदोलनस्थळावरूनच आमदार रोहित पवार यांची थेट राज्याचे कृषिमंत्री आणि सहकार मंत्र्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने रोहित पवार यांची कृषिमंत्री आणि सहकार मंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी 2019 च्या कर्जमाफीची जाचक अट मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे माध्यमांसमोर जाहीर करावे, तरच आम्ही हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा विचार करू, अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे. दरम्यान या संवेदनशील प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत एक विशेष बैठक लावण्याचे आश्वासन मंत्र्यांनी रोहित पवारांना दिले आहे. (Rohit Pawar Protest Pandharpur)
सरकारच्यावतीने उपजिल्हाधिकारी सचिन इथापे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, DySp प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्याही फोनवर संपर्क घडवून आणला. यावेळी पुढील दोन-तीन दिवसांत… pic.twitter.com/LJZSVOylgm
– रोहित पवार (@RRPSpeaks) 12 जून 2026
रोहित पवार एबीपी माझाशी बोलताना काय म्हणाले? (Rohit Pawar Protest Pandharpur)
सध्या कृषी मंत्र्यांकडून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आंदोलनाची माहिती समजल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात शेतकरी नेते देशभरातून पंढरपूरकडे येत असल्याची माहिती आहे. मनोजदादा जरांगे हे देखील आंदोलन स्थळी येणार असल्याची माहिती समजत असून अनेक काँग्रेसचे आणि इतर नेतेही येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझे वडील पत्नी आणि मुले खूप भाऊक झाली असल्याचे समजत आहे. वडील कालपासून येथे आंदोलनस्थळी आहेत. तर मुलं बाबा लवकर हे थांबवून घरी ये, असे निरोप देत आहेत. पण आता माघार नसल्याचे रोहित पवार म्हणाले. तुम्ही शक्तिपीठ महामार्गाला हजारो कोटी खर्च करताना शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत अटी कशाला असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. जोपर्यंत कर्जमाफीमधील अटी काढून सर्वांना दोन लाख रुपयाची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही, अशी ठाम भूमिका रोहित पवारांनी व्यक्त केली. तसेच आम्हीही जिद्दी आहोत. जोपर्यंत कर्जमाफीमधील जाचकाठी निघत नाही आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला.
संबंधित बातमी:
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!
Comments are closed.