Gopichand Padalkar : “रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, एफआरपी मिळेपर्यंत उपोषण…”; पडळकरांची सोलापूर पोलीसांकडे मागणी, म्हणाले…
सांगली : केवळ नाटक करण्यापूरतं आमदार रोहित पवारांचं (Rohit pawar) आंदोलन आहे. एक्टिंग करायचं रोहित पवारांना माहिती आहे,अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. तसेच नाटक कश्याला करताय, हे चित्रपटाचे शूटिंग आहे का ? नटरंग चित्रपटाचे शूटिंगची एक्टिंग करायला गेला आहे ,का ? अशा शब्दात पडळकर (Gopichand Padalkar) यांनी रोहित पवारांच्या (Rohit pawar) पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावावर टीका केली आहे. तसेच रोहित पवारांना आपलं आवाहन आहे, जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साखर कारखानादार एफआरपी देत नाहीत, तोपर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवावं, सोलापूर जिल्हा पोलीस प्रमखांना आपली मागणी आहे, रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या बाजूने पूर्ण सुरक्षा लावून, रोहित पवार (Rohit pawar) याला अन्नाचा एक घास देखील खाऊ देऊ नका, रोहित पवारांना एक दोन महिने आंदोलनला बसू द्या, असे देखील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणालेत, त्याच बरोबर रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे खळ सगळ्यात जास्त लुटलंय,अशी टीका देखील पडळकर यांनी केली आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते. (Gopichand Padalkar)
तर रोहित पवारांना माझा आव्हान आहे की, जोपर्यंत साखर कारखान्याने एफआरपी दिलेली नाही ती एफआरपी जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत उपोषणाला बसलं पाहिजे, अन्नत्याग केला पाहिजे, सोलापूर एसपी साहेबांना माझी विनंती आहे. पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारांच्या बाजूला लावा, त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका, नुसत्या बातमीपुरत, नाटक करण्यापुरतं, रोहित पवाराचं हे आंदोलन आहे, ते होता कामा नाही. सहा कोटी पासून यांनी ढापलेत 100 ते 200 कोटीचे कारखाने कशाला रे, तुम्ही हे नाटक करताय हे काय पिक्चरच शूटिंग चालू आहे का? असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.
Rohit Pawars hunger strike : रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू
30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. परंतु या कर्जमाफीमधील एका अटीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. सरकारने कर्जमाफीमधील अटी रद्द करून दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे, आणि त्यासाठी पंढरपूरमध्ये रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!
Comments are closed.