5 हजार कोटींचा घोटाळा, रोहित पवारांचा गौप्यस्फोट; महायुतीतील एक मंत्री आमदारांच्या निशाण्यावर

मुंबई : राज्यातील महायुती सरकारमधील अनेक मंत्र्‍यांवर गंभीर आरोप केले जात असून काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी समोर आणला होता. त्यानंतर, माणिकराव कोकाटेंकडून कृषि खातं काढून घेण्यात आलं असून आता त्यांच्याकडे क्रीडामंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री योगेश कदम, संजय शिरसाट यांच्यावरही गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्र्‍यांनी आणि उपमुख्यमंत्र्‍यांनी मंत्रीमहोदयांना इशारा देत खडसावलं. आता, रोहित पवारांनी तब्बल 5000 कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत आणखी एका मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवारांकडून महायुती सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोमवार 18 ऑगस्ट उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन तब्बल 5 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर आणण्यात येणार आहे, अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्सवर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच, वर्तमानातील गद्दारांची इतिहासातील गद्दारांशी हातमिळवणी म्हणत रोहित पवारांकडून भाजपसोबत सत्तेत झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षावर निशाणा साधण्यात आलाय. त्यामुळे, पत्रकार परिषदेतून रोहित पवार नेमका कुणाचा घोटाळा बाहेर काढतात याची चर्चा आणि उत्सुकता महायुतीसह महाविकास आघाडीतील नेत्यांनाही लागून आहे.

गँग्ज ऑफ गद्दार म्हणत सूचक इशारा

5 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्‍याचा, की पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोहित पवारांकडून लक्ष होणार याबाबत उद्या सकाळी साडे नऊ वाजता स्पष्टता येणार आहे. रोहित पवारांची उद्या सकाळी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे. वर्तमानातील गद्दारांची इतिहासातील गद्दारांशी हातमिळवणी म्हणत रोहित पवारांनी शिंदेंच्या शिवसेनेकडे बोट दाखवलं आहे. ‘गँग्ज ऑफ गद्दार म्हणत 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा दावा केल्याने हा घोटाळा नेमका कोणत्या खात्याशी आणि कोणत्या मंत्र्‍यांशी संबंधित आहे, हेच उद्या स्पष्ट होईल.

दरम्यान, रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात सांगलीतील एका कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगली होती. रोहित पवारांनी अजित दादांना भावकीची आठवण करुन दिल्यानंतर काका अजित पवारांनीही शेलक्या शब्दात रोहित पवारांचा समाचा घेतला होता. तसेच, मी भावकी जपली म्हणून तू आमदार झाला, माझ्या नादी लागू नको, अशा शब्दात इशाराही दिला होता. त्यानंतर, आता रोहित पवारांनी आणखी एका मंत्र्याला लक्ष्य केल्याने हे मंत्री महोदय कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! भाजपचं पुन्हा एकदा धक्कातंत्र, उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावाची घोषणा

आणखी वाचा

Comments are closed.