निलेश घायवळच्या पासपोर्टसाठी कोणाचा फोन? अहमदाबाद एअरपोर्टवर सोडायला कोण गेलं? रोहित पवारांचे स
Rohit Pawar & Nilesh Ghaywal: परदेशात फरार झालेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांशी घनिष्ट संबंध असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) हा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या जवळचा आहे. राम शिंदे यांनी ओपन मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी निलेश घायवळचा उपयोग केल्याची चर्चा आहे. राम शिंदे (Ram Shinde) यांनीच निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली. राम शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांना फोन करुन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली असावी. अथवा गृहमंत्रालयातून त्यासाठी योगेश कदम यांच्यावर दबाव आला असावा, असा आरोप रोहित पवार यांनी केला. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी रोहित पवार यांनी निलेश घायवळ याचे राम शिंदे, संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांच्याशी हितसंबंध असल्याचा आरोपही केला. निलेश घायवळच्या भावाला गुन्हेगारी रेकॉर्ड असूनही बंदुकीचा परवाना देण्यात आला. एरवी व्यापाऱ्यांना गरज असूनही बंदुकीचा परवाना सहज मिळत नाही. पण गुंडाच्या भावाला सहजपणे बंदुकीचा परवाना मिळत असेल तर यामध्ये वरिष्ठ स्तरावरील लोक गुंतले आहेत. त्यामध्ये राम शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असू शकतो, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.
एरवी सर्वसामान्य लोकांना पासपोर्ट मिळवण्यासाठी बरेच खेटे मारावे लागतात. पण गंभीर गुन्हे दाखल असलेल्या निलेश घायवळ याला खोट्या नावाने पासपोर्ट दिला जातो. यानंतर तो भारत सोडून परदेशात गेला. निलेश घायवळ अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला गेला असावा. त्यासाठी धाराशिवच्या नेत्याने आणि राम शिंदे यांनी त्याला मदत केली असावी. गौतमी पाटील अपघाताच्यावेळी गाडीत नसूनही भाजपचे मंत्री तिला उचलायची भाषा करतात. मग इतक्या मोठ्या गुंडावर कारवाई का केली जात नाही? हा निलेश घायवळ बड्या नेत्यांच्या निवडणूक प्रचारात दिसतो. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील समीर पाटील हे निलेश घायवळ याचे निकटवर्तीय आहेत. या दोघांचे फोटो आणि संभाषणाच्या क्लीपही आहेत. समीर पाटील यांनी निलेश घायवळ याला बऱ्याचदा मदत केली आहे. हे सरकार गुंडांना पाठबळ देते. हे सरकार गुंडांचं आणि कंत्राटदारांचं आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
Tanaji Sawant and Santosh Banger: घायवळ प्रकरणात तानाजी सावंत आणि संतोष बांगर यांच्यावर रोहित पवारांचे आरोप
राम शिंदे, संतोष बांगर हे निलेश घायवळ याला सहजपणे अधिवेशनात घेऊन येतात. या गुंडाला आत येण्याची परवानगी कशी मिळते? हे गुंड येऊन रिल काढतात. तानाजी सावंत यांचा याप्रकरणाशी थेट संबंध नसला तरी त्यांच्या कुटुंबातील लोक यामध्ये गुंतले आहेत. जिथे पवनचक्की आहे, तिकडे शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्यात आल्या. त्यामध्ये निलेश घायवळ याचा सहभाग होता. भ्रष्टाचार आणि गुंडांच्या बाबतीत पुणे शहर एक नंबरला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=ifxlgvwbssq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.