महाराष्ट्राला नको असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद द्यायचंय म्हणून झिरवाळांना पक्षाकडूनच अडचणीत आणलं
रोहित पवार आणि धनंजय मुंडे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पेटली आहे. बैठकीतून आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नाव न घेता रोहित पवारांवर (Rohit Pawar) जोरदार टीका केली होती. त्याला उत्तर देताना रोहित पवारांनी थेट निशाणा साधत, महाराष्ट्राला नको असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद द्यायचंय म्हणून नरहरी झिरवाळांना पक्षाकडूनच अडचणीत आणलं जातंय, असा आरोप केलाय.
Rohit Pawar and Dhananjay Munde : नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले की, या चार नेत्यांना फक्त राजकारण करायचे आहे. तुम्ही सत्तेत आहात, मी जे लढतोय तो लढा सत्तेत आहात तर तुम्ही दिला पाहिजे. आम्हाला गुन्हा दाखल करण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. मला त्या व्यक्तीबद्दल बोलायाचं नाहीये. नरहरी झिरवाळ यांना अडचणीत टाकण्याचं काम त्यांच्या पक्षाकडून केलं जात आहे. त्यांना बाजूला करून महाराष्ट्राला नको अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मंत्रिपद द्यायचे आहे. त्यासाठी नरही झिरवाळ यांना अडचण निर्माण केली जात आहे, असे त्यांनी म्हटले.
dhananjay Munde on Rohit Pawar: धनंजय मुंडेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल
दरम्यान, मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटावर अप्रत्यक्ष टीका केली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. बैठकीला प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ उपस्थित होते. मुंडे म्हणाले, दादांच्या अकाली निधनानंतर सर्वांनी निर्णय घेतला की, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचे. माझी मध्यंतरी वाचा गेली होती. तशीच गेली असती तर बरे झाले असते, असं म्हणण्याची वेळ माझ्यावर आली आहे. कारण आपल्या मुखातून दादांबद्दल शोक व्यक्त करण्याची वेळ आली नसती. महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुनेत्रा ताई व्यवस्थित सांभाळातील, असा आम्हाला विश्वास आहे. वहिणींना शपथविधीची घाई झाली होती, आम्ही दबाव टाकत होतो असे म्हणणाऱ्यांना माझा सवाल आहे. अजित दादांना अग्नी द्यायच्या आधी तुम्ही विलिनीकरणाची भाषा बोलत होतात ते काय होते? ज्यावेळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हा तुम्हाला वाटले नाही का शुभेच्छा देणारे एक साधे ट्विट करावे? महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला काही कळत नाही? असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता
Dhananjay Munde on Rohit Pawar: बारामतीला एफआयआरसाठी स्टंट
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, आज सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करणार हे आम्ही आधीच जाहीर केले होते. काल एफआयआर घेतला नाही म्हणून स्टंट केला. आज बारामतीला एफआयआरसाठी स्टंट केला. हे सगळे आमच्या न्यूज किलिंगसाठी केले जात आहे. माझ्या सारख्याला हे खूप किळसवाणे वाटते, असे म्हणत त्यांनी रोहित पवारांवर टीका केली.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.