मुंबईत ठाकरे बंधू एकत्र, कुटुंब म्हणत राोहित पवारांचं सूचक ट्विट; शरद पवारांचा व्हिडिओ शेअर

मुंबई : शिवसेना (Shivsena) सोडल्यानंतर स्वतंत्र पक्ष स्थापन करुन राज ठाकरे शिवसेनेपासून दूर गेले. तेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसले नाहीत. आता, तब्बल 20 वर्षानंतर मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधू एकत्र आले. शिवसेना-मनसेच्या राज्यातील कार्यकर्त्यांनी राज्यभरात जल्लोष केला. अखएर, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा शिवसेना (Shivsena) आणि मनसेच्या नेत्यांनाही तितकाच आनंद झाला. आमदार अनिल परब किशोरी पेडणेकर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, तर बाळा नांदगावकर हेही भावुक झाले होते. ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचा दाखल देत रोहित पवार यांनी सूचक ट्विट केलं आहे. शरद पवारांना (Sharad pawar) विचारलेल्या प्रश्नाचा आणि आजच्या ऐतिहासिक्षणाचा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवार यांनी भविष्यातील पवार कुटुंब एकत्र येण्याची आशा व्यक्त केल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्रद्वेष्ट्यांना ‘एसी’मध्येही दरदरून घाम फोडणारा दोन दशकांतील ऐतिहासिक क्षण. आपल्या भारतीय परंपरेला साजेसं आणि महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं कुटुंब एकत्र येतानाचं आशादायी चित्र, असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यावरुन, रोहित पवार यांनी आशादायी चित्र म्हणत एकप्रकारे भविष्यात पवार कटुंब देखील एकत्र येण्याचा असाच क्षण पाहायला मिळेल, असेच सूचवले आहे. कारण, आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी कुठेही ठाकरे बंधू असा उल्लेख न करता कुटुंब एकत्र आल्याचा उल्लेख केला आहे.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडून राजकीयदृष्ट्या पवार कुटुंब वेगळं झालं आहे. मात्र, आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर हे आशादायी चित्र असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो- ठाकरे

जे दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवलं असे म्हणत राज ठाकरेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे श्रेय देवेंद्र फडणवीसांचे असल्याचे म्हटले. तर, एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असे म्हणत उद्धव ठाकरे यांनीही आगामी महापालिका निवडणुकीतील युतीचे संकेद दिले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा विजयी मेळावा आज अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एका व्यासपीठावर आले. त्यामुळे, अनेकांना स्व. बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली. कारण, शिवसैनिकांसाठी, शिवसेनेतील अनेक नेत्यांसाठी हा क्षण डोळ्यातून आनंदाश्रू वाहणारा होता.

हेही वाचा

Video: ठाकरे एकत्र, कंठ दाटला, डोळे पाणावले; अनिल परब, बाळा नांदगावकर, पेडणेकरांना बाळासाहेब आठवले

आणखी वाचा

Comments are closed.