IPL 2026 -रोहित शर्माने पुन्हा एकदा जिंकली सर्वांची मनं, सराव करताना ग्राऊंड्समनला चेंडू लागल्यावर गेला धावून…
रोहित शर्मा जेवढा महान क्रिकेटपटू आहे, तेवढाच तो मोठ्या मनाचाही आहे आणि ही गोष्ट पुन्हा एकदा पाहायला मिळाली. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्ससाठी वानखेडेवर सराव करत होता. नेट्समध्ये सराव करत असताना रोहित शर्माने एक जोरात फटका मारला, जो मैदानातील एका कर्मचाऱ्याला लागला. त्यावेळी लगेच डॉक्टरांनी त्याच्याकडे धाव घेतली. रोहित शर्माला यावेळी आपला सराव कायम ठेवण्यासाठी सांगितले होते, पण रोहितमधील माणुसकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. रोहित शर्माला वाटलं असतं तर तो आपला सराव सुरू ठेवू शकला असता, पण रोहितने तसे केले नाही. रोहित हा त्या कर्मचाऱ्याच्या दिशेने गेला आणि विचारपूस केली अन् सर्वांची मनं जिंकली.
रोहित शर्मा सध्या मुंबईच्या संघात खेळताना पाहायला मिळत नाही. रोहित शर्माने यंदाच्या मोसमात चार सामने खेळले होते आणि त्यामध्ये त्याने 137 धावा केल्या आहेत, पण त्यानंतर रोहितला दुखापत झाली आणि तो खेळू शकला नाही. सोमवारी वानखेडेमध्ये उतरत त्याने 83 धावांची तुफानी खेळी साकारली आणि दमदार पुनरागमन केले. पण लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित हा सराव करण्यासाठी उतरला होता.
रोहित शर्मा नेट्समध्ये एवढ्या सहजपणे सराव करत होता की, त्याला दुखापत झाली आहे असे कोणालाही वाटत नव्हते. रोहित शर्माने लखनौच्या सामन्यापूर्वी मैदानात चांगलाच घाम गाळला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबईच्या संघाची वाईट कामगिरी पाहायला मिळाली. रोहितने या सामन्यापूर्वी कसून सराव केला आणि त्यावेळी त्याने मैदानातील कर्मचाऱ्याबाबत दाखवलेली माणुसकी हा चर्चेचा विषय ठरत आहे.
दुसरीकडे मुंबईच्या संघाला सूर गवसला. मुंबई इंडियन्स आतापर्यंत 10 सामने खेळली आहे, ज्यामध्ये त्यांना फक्त तीन सामने जिंकता आले आहेत, तर सात सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता मुंबईचे फक्त चार सामने बाकी आहेत. मुंबई या परिस्थितीत प्ले ऑफमध्ये पोहोचणे कठीण समजले जात आहे, पण एक अंधुकशी संधी मुंबईला खुणावत आहे.
मुंबईने जर उर्वरित चारही सामन्यांत विजय मिळवला आणि आपला रनरेट चांगला राखला, तरच त्यांना प्ले ऑफ खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे लखनौविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता.
Comments are closed.