भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर अडचणीत; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी केली पाठराखण, म्

पुणे: भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांच्या (Rupali Chakankar) अडचणी वाढल्या असताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र रूपाली चाकणकर यांची पाठराखण केली आहे. या प्रकरणात रूपाली चाकणकर (Rupali Chakankar)  यांचा काही दोष नाही, रूपाली चाकणकर या काही स्वतःहून गेलेल्या नाहीत कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असतील महाराजाचं दर्शन झालं असेल किंवा त्या भेटल्या असतील आपण कोणाला तरी गुरू मानतो, यात रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची कुठलीही चूक नाही. मला जर कोण कुठे चल म्हटलं तर अन् मी गेलो आणि पुढच्याने माझा फोटो काढला त्यावरून काय झालं तर यात काय माझी चूक ? असा प्रति प्रश्न भरणे यांनी विचारला आहे. तसेच त्यांनी बारामती मध्ये काँग्रेस उमेदवार देणार यावरती देखील भाष्य केलेला आहे.

नाशिक येथील कॅप्टन खरात प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादात रुपाली चाकणकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, चाकणकर या एखाद्या कार्यक्रमात किंवा दर्शनासाठी गेल्या असतील तर त्यात त्यांची कोणतीही चूक नाही. यावेळी भरणे म्हणाले, “समजा एखाद्या ठिकाणी आता मी इथे माळवाडीत आलोय, आणि सरपंच मला म्हणाले की इथे असे महाराज आहेत आपण दर्शनाला जाऊया. आता आलोय तर महाराजांचे दर्शन घेऊ, भेट घेऊ. त्यात मला महाराजांबद्दल सरपंचच सांगू शकतील. आता महाराज चांगले आहेत की तुमच्या भाषेत भोंदू आहेत आम्हाला काय माहिती? त्या बाबतीत रूपाली चाकणकरांचा काही दोष नाही. शेवटी आपला हिंदू माणूस आपल्याला काही असलं तर आपण स्वतःहून गेलेलो नसतो, कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असतील, महाराजांचे दर्शन झालं असेल किंवा भेटले असतील, त्यावरून कोणाला तरी आपण गुरु मानतो. त्यात रूपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा चूक नाही.”

सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून भरणे यांचे आवाहन

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दत्तात्रय भरणे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे स्वागत केले असून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. भरणे यांनी भावनिक साद घालत म्हटले, “माझी विनंती आहे सर्वांना की ही निवडणूक बिनविरोध करावी. शेवटी ज्या नेत्यानं, अजितदादा पवार साहेबांचं आजही नाव घेतल्यानंतर लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, त्यांच्या घरातल्या त्यांच्या पत्नी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभ्या राहतात, त्यामुळे सगळ्यांनी खरंतर वहिनींना पाठिंबा दिला पाहिजे. ही निवडणूक बिनविरोध केली पाहिजे आणि समजा कोणी स्वतःच्या हवसेपोटी चुकून उभं राहिलं, तर काय त्याची अवस्था होईल हे मी सांगायची गरज नाही.”

आणखी वाचा

Comments are closed.