मालेगावातील चिमुरडीला न्याय देण्यासाठी महिला आयोग अॅक्शन मोडवर; रुपाली चाकणकरांची संतप्त प्रति
रुपाली चाकणकर : नाशिकच्या (Nashik) मालेगाव (Malegaon) तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनार याने आधी चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने तिचे डोके ठेचून अमानुषपणे हत्या केली होती. या घटनेचा राज्यभरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. या प्रकारातील आरोपीला फाशीची शिक्षा करावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मालेगावातील चिमुरडीला न्याय देण्यासाठी महिला आयोग अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. आरोपीला अटक केली पण केवळ आरोपीला अटक करणे एवढ्यावर थांबले नाही तर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फास्ट ट्रॅकवर केस चालली पाहिजे ही आम्ही मागणी केली आहे. या मागणीचा पाठपुरावा केला जाणार आहे.
Rupali Chakankar: तळपायाची आग मस्तकात जाणारी घटना
लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला आधी कमी शिक्षा होती ती आता नवीन कायद्यानुसार कठोर केली आहे. याधीच्या घटनांमध्ये महिला आयोगाने पाठपुरावा केला. तीन घटनेत आरोपीला कठोर शिक्षा देण्यात आली आहे. मात्र, तळपायाची आग मस्तकात जाणारी ही घटना आहे. त्या मुलीला वेदना झाल्या असतील तशाच वेदना आरोपीला झाल्या पाहिजेत, अशी सर्वांची मागणी आहे. पण कायद्यानुसार त्याला शिक्षा दिली जाईल. मी कुटुंबियांची भेट घेणार आहे. त्यांचं काय म्हणणे आहे ते जाणून घेणार आहे. त्यांनतर पुढील भूमिका मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Asif Shaikh: सौदी अरेबिया सारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा : आसिफ शेख
दरम्यान, डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेले अत्याचार व त्यानंतर निर्घुण खून करण्यात आला होता या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुस्लिम बहुल असलेल्या व संवेदनशील मानल्या गेलेल्या मालेगाव शहराचा पूर्व भाग आज कडकडीत बंद शहरातील प्राथमिक आणि हायस्कूल यांना सुट्टी जाहीर शाळेचे बाहेर फलक लावून सुट्टी जाहीर करण्यात आली. दरम्यान, सौदी अरेबियासारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा, म्हणजे महिलांवरील अत्याचार कमी होतील, अशी मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.