रुपाली चाकणकरांचा धक्कादायक फोटो समोर, महिलेवर अत्याचाराचा आरोप असलेल्या अशोक खरातची पाद्यपूजा
नाशिक क्राईम न्यूज अशोक खरात: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला गुन्हे शाखेने बुधवारी पहाटे बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. कॅप्टन उर्फ अशोक खरात (Ashok Kharat) हा अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळे भविष्याविषयी मार्गदर्शन घ्यायला त्याच्याकडे अनेक बड्या व्यक्ती येत असत. यामध्ये बडे राजकारणी, उद्योगपती आणि नामवंत सेलिब्रिटींचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी), मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यासोबतचे अशोक खरात याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज सकाळीच रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरल्याचा फोटो समोर आला होतो. यानंतर त्यांचा आणखी एक धक्कादायक फोटो समोर आला आहे. यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातचे पाद्यपूजन करताना दिसत आहेत. या फोटोमुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या व्यक्तीने एका भोंदूबाबाच्या इतक्या आहारी जाणे आणि ज्या व्यक्तीकडे अत्याचारित महिलांना न्याय देण्याची जबाबदारी आहे, त्यानेच अशाप्रकारचे कृत्य करणे कितपत बरोबर आहे, असा सवाल आता विचारला जात आहे. यावर रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सिन्नर तालुक्यात अशोक खरात याने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे, या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनाही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते, तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता. नाशिकच्या पोलीस गुन्हे शाखेने बुधवारी पहाटे अशोक खरात याला अटक केली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले जाईल. त्यापूर्वी पोलिसांनी अशोक खरात याच्या नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयावर छापा टाकला होता. याठिकाणी पोलिसांना एक पेनड्राईव्ह सापडला. यामध्ये 58 जणांचे व्हिडीओ आहेत. या व्हिडिओमध्ये अनेक राजकीय नेते, मंत्री तसेच मोठमोठे सेलिब्रिटी, नामांकित महिला यांचे व्हिडिओ असल्याचा देखील पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
Nashik news: नेमकं काय घडलं?
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.