‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला… खडसेंच्या लेकीची रुपा
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी लागेबांधे असल्यामुळे आजवरच्या राजकीय कारकीर्दीत सर्वात मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना पत्र पाठवून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली. अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद गमवावे लागले आहे. यानंतर चाकणकर यांचे विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहेत. शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर बोचऱ्या भाषेत टीका केली. ‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला…, अशी टिप्पणी रोहिणी खडसे यांनी केली. (Maharashtra Politics news)
अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही चाकणकर यांना लक्ष्य केले होते. चाकणकरने राजीनामा दिला नाही घेतला गेला आहे,
भोंदूबाबा खरात बलात्कार प्रकरणात त्या आरोपी असल्याने सगळी चौकशी होणार. SIT ला मर्यादा होत्या आता त्या संपल्या. धन्यवाद मा. सुनेत्रा वहिनी. ज्या सर्व लोकांनी हया पदाचा दुरुपयोग केला ते सर्व आरोपी आहेत. आज मा. अजितदादांच्या कार्यकर्त्या बहिणी समाधानी झाल्या आहेत, असे रुपाली ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
मात्र, रुपाली चाकणकर यांनी आपण या प्रकरणातून तावुन सुलाखून बाहेर पडू, अशाप्रकाराच विश्वास व्यक्त केला आहे. खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री,मा.पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, अशी भूमिका चाकणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली होती.
‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला… #महाराष्ट्र #राजकारण
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) 28 मार्च 2026
Rupali Chakankar: रुपाली चाकणकर राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय म्हणाल्या?
प्रति
आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा.
आपली विश्वासू
रुपाली निलेश चाकणकर
आणखी वाचा
मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
आणखी वाचा
Comments are closed.