शिंदे गटात जाताच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र धाडलं; म्हणाले, साहेब…

सचिन अहिर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश विधान परिषदेतील उपसभापती पदाच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026) शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी अर्ज भरला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांचं धक्का बसला आहे. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. (Sachin Ahir Join Shivsena Shinde Group)

कालपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत असलेले आणि आदित्य ठाकरेंसोबत सावलीसारखे वावरणारे सचिन अहिर यांनी आज शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. आज सकाळपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी कुणाला संधी मिळणार याची चर्चा होती. मात्र, आज अचानक शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केल्याची दृश्य समोर आली. एकनाथ शिंदेंनी अहिर यांना उमेदवारी देऊन ठाकरे पितापुत्रांना मोठा धक्का दिल्याचं बोललं जातंय. याआधीच ठाकरेंचे 6 खासदार फोडून शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवलं होतं. त्यानंतर ठाकरेंनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा केला. हा दौरा संपत नाही तोच शिंदेंनी ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला. दरम्यान सचिन अहिर यांनी पक्षांतर केलेलं नाही तर शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय, असं संजय शिरसाट यांनी जाहीर केलं. दरम्यान, सचिन अहिर यांनी भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सचिन अहिर यांनी राजीनामा दिला.

शिंदे गटात सामील होताच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना पाठवले पत्र- (सचिन अहिर उद्धव ठाकरेंना पत्र)

शिंदे गटात जाताच सचिन अहिर यांनी माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणत एक पत्र धाडलं. यामध्ये सचिन अहिर यांनी शिवसेना ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा (Sachin Ahir has resigned from all posts within the Shivsena UBT) दिला आहे. सरचिटणीस भारतीय कामगार सेनेच्या तसेच अध्यक्ष बृहन्मुंबई बेस्ट कामगार सेना या पदांवर कार्यरत आहे. आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि उपरोक्त पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले व पक्षाचे मनःपूर्वक आभारी आहे. तथापि, मी काही अपरिहार्य कारणास्तव मी भारतीय कामगार सेनेचा व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पदांचा राजीनामा देत आहे. तरी महोदय आपण माझा हा राजीनामा मंजूर करण्यात यावा, तसचे आपण दाखविलेला विश्वास व प्रेम कायम असेच राहवे, ही नम्र विनंती. पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा सदैव राहतील, असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. (Sachin Ahir Shivsena)

सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात काय काय म्हटलं? (Sachin Ahir On Uddhav Thackeray )

आदरणीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेब,

साहेब, शिवसेना पक्षप्रमुख
प्रेमळ जय महाराष्ट्र

प्रिय महोदय,

सविनय विनंती करतो की, मी सचिन अहिर, सरचिटणीस भारतीय कामगार सेनेच्या तसेच अध्यक्ष बृहन्मुंबई बेस्ट कामगार सेना या पदांवर कार्यरत आहे. आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि उपरोक्त पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले व पक्षाचे मनःपूर्वक आभारी आहे. तथापि, मी काही अपरिहार्य कारणास्तव मी भारतीय कामगार सेनेचा व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पदांचा राजीनामा देत आहे. तरी महोदय आपण माझा हा राजीनामा मंजूर करण्यात यावा, तसचे आपण दाखविलेला विश्वास व प्रेम कायम असेच राहवे, ही नम्र विनंती. पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा सदैव राहतील. धन्यवाद.

आपला,

सचिन अहिर

उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का- (Sachin Ahir Join Shivsena Shinde Group)

राज्यात नुकत्याच ऑपरेशन टायगरने खळबळ उडाली होती. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक आमदार देखील शिंदे गटात येतील, असा दावा करण्यात येत होता. त्यातच आज ठाकरेंचं विधान परिषदमधील आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापतीपदासाठी अर्ज भरल्याने ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते. त्यातील सचिन अहिर होते.

सचिन अहीरांचे पक्षांतर का मोठे? (Sachin Ahir Marathi News)

  • सचिन अहिर आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय
  • आदित्य ठाकरेंसाठी सचिन अहिरांनी सोडला होता वरळी विधानसभा मतदारसंघ
  • वरळीत राहणाऱ्या विधानपरिषदेच्या दोन आमदारांपैकी सचिन अहिर एक
  • काही दिवसांपूर्वीच शिंदेंकडून सचिन अहिर यांना पक्षात येण्याची ऑफर
  • शिवसेनेत आल्यास उपसभापतीपदाची उमेदवारी देण्याचं शिंदेंचं आश्वासन
  • खा.संजय दिना पाटलांच्या प्रवेशानंतर सचिन अहिरांचा पक्षप्रवेशास तयार
  • सचिन अहिर यांची वरळीमध्ये स्वतःची ताकद, कामगार संघटनांवर प्रभुत्व
  • सहा खासदारांना खेचल्यानंतर सचिन अहिरांनाही घेऊन शिंदेंचा ठाकरे-पिता पुत्रांना मोठा धक्का

कोण आहेत सचिन अहिर? (Who Is Sachin Ahir?)

  • सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे विधानपरिषदेचे आमदार
  • विधानसभा निवडणुकीत तीन वेळा,विधानपरिषदेवर एकदा विजयी
  • वरळीमधून 1999, 2004 ,2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी
  • 2009 ला गृहनिर्माण राज्यमंत्रिपदी
  • 26 जुलै 2019 ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल
  • 2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी
  • 2022 मध्ये विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती
  • 30 जून 2026 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत
  • 30 जून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भरला अर्ज

संबंधित बातमी:

Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार थेट शिंदे गटात; सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची Inside Story

Comments are closed.