सचिन घायवळ प्रकरण! गृहराज्यमंत्री जर शस्त्र परवाना आदेशावर सही करत असतील तर चिंताजनक : कोल्हे


Amol Kolhe on Sachin Ghaywal Arms License : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेला आहे. त्याच्याबाबत आता रोजच नवनवे खुलासे होत आहेत. सध्या निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला मिळालेल्या शस्त्रपरवान्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याच सहीनंतर सचिन घायवळ याला शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आला, अशी बाब समोर आली आहे. याबाबत विरोधकांनी कदम यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी काहीतरी स्टेटमेंट केलं आहे, ते माझ्या ऐकण्यात अजून आलं नाही.  मात्र गृहराज्यमंत्री जर अशा प्रकारे परवाना आदेशावर सही करत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबत चिंताजनक बाब असल्याचे कोल्हे म्हणाले.

चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकण कृषी समितीकडून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (PMRDA) कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये आज सकारात्मक चर्चा झाली. PMRDA च्या माध्यमातून ज्या पाच मिसिंग लिंकचे टेंडर काढले आहे आणि अजून 11 मिसिंग लिंकचे काम पुढील दोन महिन्यात होणं अपेक्षीत आहे. सगळ्यात मोठा रेव्ह्यू देणारी औद्योगिक वसाहती चाकणची आहे, त्यामुळे येथील अंतर्गत रस्ते होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

पुणे नाशिक महामार्गाचे पीएमआरडीकडून भूसंपादन सुरू आहे. मार्च एप्रिल पर्यंत पुणे नाशिक महामार्गाचे काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. शिक्रापूरच्या चाकण तळेगाव याही रस्त्याचं लवकरच काम पूर्ण होईल असे आश्वासन दिल्याची माहिती कोल्हे यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागाचा कोणताही निधी वळवणे हे दुर्दैव

लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाच्या मुद्यावर देखील अमोल कोल्हे यांनी वक्तव्य केलं. सामाजिक न्याय विभागाचा कोणताही निधी वळवणे हे दुर्देव आहे. समाजातील शोषित वंचित घटकांसाठी निधीचा वापर होणे जास्त गरजेचं आहे. सरकारचा निधी जर पुरत नसेल तर नेमक्या योजना का जाहीर करत हा मोठा प्रश्न तयार होतो असेही कोल्हे म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.