SAFF Championship – हिंदुस्थानने पाकिस्तानचा गेम केला! पहिल्याच सामन्यात 3-2 ने उडवला धुव्वा, गुणतालिकेत अव्वल
SAFF Championship 2026 मध्ये आपला पहिला सामना खेळताना हिंदुस्थानच्या फुटबॉल संघाने आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा हिंदुस्थानने 3-2 अशा फरकाने पराभव करत विजयी श्री गणेशा केला. हिंदुस्थानच्या सुहेल अहमद भट्ट आणि मँगलेनथांग किपगेन यांनी धडाकेबाज कामगिरी करत हिंदुस्थानच्या विजयात खारीचा वाटा उचलला.
हिंदुस्थानचा संघ मैदानात उतरतानाच पूर्ण जोशात उतरला होता. हाच जोश कायम ठेवत संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच संघाने आक्रमक खेळ करत पहिल्या हाफमध्येच 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली. हिंदुस्थानच्या सुहेल अहमद भट्टने 13 व्या आमि 19 व्या मिनिटाचा दोन गोल करत पाकिस्तानचा जबर धक्के दिले. त्यानंतर 31 व्या मिनिटाला मँगलेनथांग किपगेन तिसरा गोल गरत टीम इंडियाचला मजबूत स्थितीत आणलं.
सामन्याच्या अतिरिक्त वेळेत पाकिस्तानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. 90+1 व्या मिनिटाला नजीब उल्लाहने आणि 90+4 व्या मिनिटाला आलमगीर गाझीने गोल करत सामना 3-2 असा रंगतदार केला. मात्र, पाकिस्तानला विजयापर्यंत मजल मारता आली नाही आणि वेळेअभावी त्यांचे पुनरागमन उशिरा झाल्याने हिंदुस्थानने हा सामना जिंकत स्पर्धेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयासह ग्रुप ए मध्ये हिंदुस्थाने पहिल्या क्रमांकवर उडी मारली आहे. हिंदुस्थानचा पुढचा सामना आता 11 नोव्हेंबर रोजी मालदीवविरुद्ध होणार आहे.
Comments are closed.