मोठी बातमी! CSK आणि SRH मध्ये झाली मोठी ट्रेड, आयपीएल 2027 ऑक्शन आधी 4 खेळाडूंची अदलाबदल
आयपीएल २०२७ च्या मिनी ऑक्शन आधी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि सनरायझर्स हैद्राबाद (SRH) यांच्यात मोठा ट्रेड झाला आहे. मागील काही आठवड्यांपासून केवळ हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत चर्चा सुरू होती. आता ही ट्रेड झाली आहे. सीएसकेने दोन खेळाडूंच्या बदल्यात एसआरएचकडून दोन खेळाडू घेतले आहेत.
सीएसकेने एसआरएचकडून खलील अहमद आणि नॅथन एलिस यांच्या बदल्यात लियाम लिविंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्स यांना संघात सामील केले आहे.
सीएसकेने गुरूवारी (५ नोव्हेंबर) त्यांच्या अधिकृत सोशल मीडियाच्या अकाउंट्सवरून ही माहिती दिली आहे. सीएसकेने खलील अहमद आणि नॅथन एलिस यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सीएसकेने लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्स यांना अनुक्रमे ६ कोटी आणि ३ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तसेच खलील अहमद आणि नॅथन एलिस हे अनुक्रमे ४.८ कोटी आणि २ कोटी रुपयांना सनरायझर्स हैदराबाद संघात सामील झाले आहेत.
लियाम लिव्हिंगस्टोनने इंग्लंडचे १०० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले असून १५०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने ५१ आयपीएल सामन्यांमध्ये १५५ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने १००० हून अधिक धावा केल्या आहेत.
जॅक एडवर्ड्स हा २६ वर्षीय ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने टी२० क्रिकेटमध्ये ८६५ धावा केल्या असून ५८ बळी घेतले आहेत. या उजव्या हाताच्या फलंदाजाने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये ४ शतकांसह जवळपास २५०० धावा केल्या आहेत. (Liam Livingstone and Jack Edwards in CSK, Khaleel Ahmed and Nathan Ellis join SRH IPL 2027 four-player trade)
Comments are closed.