दुसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियात मोठा बदल; 16 खेळाडूंचा संघ आता 15 जणांचा
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने 5 गडी राखून जिंकला. या मालिकेसाठी दोन स्वतंत्र संघ निवडण्यात आले होते; मात्र, पहिल्या सामन्यानंतर 16 सदस्यांच्या मूळ संघातून एक खेळाडू बाहेर पडला आहे. परिणामी, दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी आता भारतीय संघात 15 खेळाडू उरले आहेत.
नितीश कुमार रेड्डीचा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. बीसीसीआयने स्पष्ट केले होते की, तो केवळ पहिल्या एकदिवसीय सामन्यापुरतेच संघासोबत असेल आणि त्यानंतर आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी ‘इंडिया ए’ (India A) संघात सामील होईल.
जरी नितीश पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी 16 सदस्यांच्या भारतीय संघाचा भाग होता, तरीही त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये (Playing11) स्थान मिळाले नव्हते.
भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर, नितीश आता आगामी अनधिकृत कसोटी सामन्यासाठी ‘इंडिया ए’ संघात सामील होईल. त्यामुळे, दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताकडे आता 15 खेळाडू उपलब्ध असतील.
दरम्यान, मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी एक वेगळा संघ निवडण्यात आला होता. ज्यात नितीशचा सुरुवातीपासूनच समावेश नव्हता. शेवटच्या दोन सामन्यांसाठी शुबमन गिल मुकणार आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर कर्णधारपद सांभाळेल.
पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने आघाडी घेतली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आता 7 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन येथे खेळवला जाईल. भारतीय संघ या सामन्यासाठी वेलिंग्टनमध्ये पोहोचला असून लवकरच त्यांच्या सरावाला सुरुवात होईल.
Comments are closed.