संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेना, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
C. संभाजीनगर : राजधानी मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी (Mahapalika election) 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. 16 जानेवारी रोजी निकालाचा गुलाल उधळला जाणार आहे. यात मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील 5 महानगरपालिकांसाठी निवडणूका होत असून छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड- वाघाळा आणि लातूर महापालिकांसाठी निवडणुकांची घोषणा झाली. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) महापालिका निवडणुकीकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर प्रथमच ही निवडणूक होत असल्याने यंदाच्या निवडणुकीत कोणाचा भगवा फडकणार, कोण महापौर होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यात महापालिका निवडणुकांसाठी एकूण 3.48 कोटी मतदार आहेत. 39 हजार 147 मतदान केंद्र असणार आहेत. मराठवाड्यातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेकडे पाहिलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सदस्य संख्या 115 एवढी असून त्या पाठोपाठ नांदेड वाघाळा महापालिका 81, लातूर 70 आणि परभणी 65 सदस्य संख्या आहे. संभाजीनगरमध्ये शिवसेना, भाजप, शिवसेना उबाठा या पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. याशिवाय, एमआयएमनेही इथं आपली ताकद निर्माण केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद येथे काही प्रमाणतच असून महापालिकेत कोणाचा झेंडा फडकणार, कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छ. संभाजीनगर महापालिकेचा इतिहास
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (AMC) ही स्थानिक नागरी संस्था आहे. त्याची नऊ झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. नगर परिषदेची स्थापना 1936 मध्ये झाली, नगर परिषद क्षेत्र सुमारे 54.5 किमी 2 होते. 8 डिसेंबर 1982 पासून ते महानगरपालिकेच्या दर्जात उन्नत झाले आणि एकाच वेळी अठरा परिघीय गावांचा समावेश करून, त्याच्या कार्यक्षेत्रातील एकूण क्षेत्रफळ 138.5 किमी 2 पर्यंत वाढवले.
शहर 115 निवडणूक प्रभागांमध्ये विभागले गेले आहे, ज्याला प्रभाग म्हणतात, आणि प्रत्येक प्रभागाचे प्रतिनिधित्व प्रत्येक प्रभागातून लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक करतात. महापौर आणि सभापती यांच्या अध्यक्षतेखाली अनुक्रमे महासभा आणि स्थायी समिती अशा दोन समित्या आहेत. पिण्याचे पाणी, ड्रेनेज सुविधा, रस्ता, पथदिवे, आरोग्य सेवा सुविधा, प्राथमिक शाळा इत्यादी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी AMC जबाबदार आहे. एएमसी नागरिकांवर लादलेल्या शहरी करांमधून त्याचा महसूल गोळा करते. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आहे; एक I.A.S. अधिकारी, विविध विभागातील इतर अधिकाऱ्यांनी मदत केली.
6 वर्षांपासून प्रशासनाकडे कारभार
संभाजीनगरमध्ये 29 ऑक्टोबर 2017 साली शिवसेना नेते नंदकुमार घोडेले हे संभाजीनगर महापालिकेचे महापौर म्हणून विराजमान झाले होते. मात्र, डिसेंबर 2019 मध्ये महापालिकेची सत्ता संपुष्टात आल्यानंतर येथे महापालिका आयुक्त हेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. आता, 6 वर्षानंतर येथील महानगरपालिकेची निवडणूक होत आहे.
संभाजीनगर महापालिका निवडणूक 29 प्रभागात 115 नगरसेवक पदासाठी 859 जण निवडणूक रिंगणात .
छत्रपती संभाजीनगरचे पक्षीय बलाबल कसे?
एकूण जागा: 115
शिवसेना: 29
भारतीय जनता पक्ष – 22
एमआयएम- 25
काँग्रेस – 10
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 03
बहुजन समाज पक्ष – 05
इतर/अपक्ष – 19
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण 115 सदस्यांपैकी 58 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. इतर मागास प्रवर्गांसाठी 31 जागा आरक्षित असून अनुसूचित जाती 22, अनुसूचित जमाती 2 झाला आरक्षित आहेत.
हेही वाचा
अरे आवाज कुणाचा!… छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष?
आणखी वाचा
Comments are closed.