समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात, दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; 25 प्रवासी जखमी

समृद्धी एक्सप्रेस वे अपघात बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. बस चालक आणि वाहकाकडून मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway Accident) एक खाजगी प्रवासी बसचा अपघात (Buldhana Accident) झालाय. या भयानक अपघातात दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 25 प्रवासी जखमी झाले आहे. सध्या जखमीवर रुग्णालयात उपचार प्रारंभ असून जखमींमध्ये सहा प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यानअपघातग्रस्त खाजगी बस दुसऱ्या एका कारवर आदळल्याने (Accident) कारचं ही मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे जखमींवर उपचार करण्यासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात एक तास डॉक्टर हजर नसल्याने नातेवाईकांचा देखील आक्रोश बघायला मिळालाय.

Samruddhi Expressway Accident: दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, 25 प्रवासी जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून – पुसदकडे जाणारी एक खाजगी प्रवासी बस समृद्धी महामार्गावर सकाळी सहाच्या सुमारास अपघातग्रस्त झाली. चालक आणि वाहक हे मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात हा अपघात घडल्याचं खाजगी बस मधील प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. मेहकर टोल नाक्याजवळ हा अपघात झाल्याने जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र त्या ठिकाणी एक तास डॉक्टर उपचारासाठी न आल्याने जखमींच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. या अपघातात एका दीड वर्ष चिमुकल्याचा मृत्यू झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहे. ज्यात सहा प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.