मनसेने आशिष शेलारांचा गोल टोपी घातलेला फोटो दाखवला, काँग्रेसकडून धार्मिक तुष्टीकरणाचा आरोप


आशिष शेलार बनावट मतदारांवर संदीप देशपांडे : महाराष्ट्रातील मतदार यादीतील (Voter List) घोळ आणि दुबार मतदारांच्या नावावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘राज ठाकरेंना केवळ हिंदूच दुबार मतदार दिसतात का?’, असा सवाल करत आशिष शेलार यांनी ‘व्होट जिहाद’ (Vote Jihad) चा आरोप केला. तर दुसरीकडे भाजपने राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ला त्याच शैलीत उत्तर दिले आहे. अशातच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आशिष शेलारांचा गोल टोपी घातलेला फोटो पोस्ट करत विचलन आहे. तर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदारांचे धार्मिक आधारावर तुष्टीकरण केले. मात्र निवडणूक आयोग यावर गप्प का? असा प्रश्न काँग्रेस नेते आणि आमदार नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला आहे.

Sandeep Deshpande : मनसेने आशिष शेलारांचा गोल टोपी घातलेला फोटो दाखवला

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीच्या आरोपांवरून महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर माविया आणि ठाकरे बंधूंच्या टीकेला भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. यात त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत, “गळा मतचोरीचा… पण पुळका ‘व्होट जिहाद’चा!” अशी टीका केली. तर या टाकेनंतर मनसेने पुन्हा प्रतिहल्ला f आणिव्यात्यामुळे आशिष शेलारांचा गोल टोपी घातलेला फोटो पोस्ट करत विचलन आहे. सोबतच मतदार यादीमधील एक फोटोहे पोस्ट केला आहे. यात खास अशिशुद्दीन यांच्यासाठी अमित साठम यांच्या मतदार संघातील बोगस घोटाळा असा उल्लेख केला आहे.

Nitin Raut : धार्मिक आधारावर तुष्टीकरण, निवडणूक आयोग यावर गप्प का?

महाविकास आघाडी आणि मनसेने (MNS) मतदार यादीतील त्रुटींविरोधात निवडणूक आयोगाकडे (Election Commission) मोर्चा काढला होता. जोपर्यंत मतदार यादीतील गोंधळ दूर होत नाही, तोपर्यंत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. अशातच आता काँग्रेस नेते आणि आमदार नितीन राऊत यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नसही करा उपस्थित केले आहेत. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदारांचे धार्मिक आधारावर तुष्टीकरण केले. मात्र निवडणूक आयोग यावर गप्प का? हा आमचा सवाल आहे. आशिष शेलार यांच्या विरोधात मी निवडणूक आयोग व न्यायालयात धाव घेणार असल्याचा पवित्रा नागपूर विधानसभेचे आमदार नितीन राऊत यांनी घेतलाय.

Ashish Shelar Fake Voters: आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

मंत्री आशिष शेलार यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेत या विषयावर भाष्य केलं, यावेळी ते म्हणाले तेलोकसभा निवडणुकीत अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळली गेली आणि हे पाप महाविकास आघाडीने केले. हा एक सुनियोजित ‘व्होटजिहाद’ होता. देश, देशातील यंत्रणा, देशाच्या सुरक्षेशी हा खेळण्याचा प्रकार होता. आज या सर्वांचा भंडाफोड आम्ही करणार आहोत.

पत्रकार परिषदेत शेलार यांनी आकडेवारी सादर करत सांगितले की, “आम्ही केवळ 31 विधानसभा मतदारसंघांचे विश्लेषण केले असून, त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दुबार मतदारांची संख्या 2 लाख 25 हजार 791 आहे. संपूर्ण 288 मतदारसंघांचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर ही संख्या 16 लाख 84 हजार 256 इतकी असेल.” ही केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार संख्या आहे. यात महाविकास आघाडीचे समर्थक नाहीत. ती आणखी कितीतरी मोठी असू शकते.

हे हि वाचा

आणखी वाचा

Comments are closed.