इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग; पोलिसांनी दोन भामट्यांना ठोकल्या बेड्या
अहिल्यानगर : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indurikar Maharaj) यांच्या मुलीच्या साखरपुड्याची जेवढी चर्चा रंगली, त्याहून अधिक चर्चा त्यांच्या कन्येच्या शाही लग्नसोहळ्याची ठरली. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दिग्गज नेते उपस्थित होते. त्यामुळे, राज्यात इंदोरीकर महाराजांच्या कुटुंबातील हा सोहळा लक्षणीय ठरला. मात्र, या लग्नसोहळ्यात आलेल्या पाहुण्यांचे सोनं चोरीला गेल्याने लग्नसोहळ्यास गालबोट लागलं. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंगचा (Gold) प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी दोन भामट्यांना अटकही केली आहे. संगमनेर पोलिसांच्या (Police) स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत दोन आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केलंय. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात आरोपी चोरट्यांनी लग्नातील पाहुण्यांचे 60 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. आरोपी सागर कांबळे आणि बबलू उर्फ अब्दुल पिंजारी या दोघांना पोलिसांनी अटक केली असून आतिक उर्फ आरीफ शेख, सनी ढोकणे हे दोघे फरार आहेत. पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू आहे. शहरातील ममदापूर फाट्याजवळ सापळा रचून अटक करत पोलिसांनी 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये, जप्तीत सोन्याचे दागिने, मोबाईल आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
इंदोरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा 3 मे रोजी विवाह संपन्न झाला. ज्ञानेश्वरी हिचा विवाह उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल यांच्याशी झाला. या शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. दरम्यान, ज्यावेळी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा झाला होता, त्यावेळी इंदोरीकर महाराजांवर मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती. आता मुलीचा विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी लग्नात भाषण करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. मुलीच्या जशी साखरपुड्याची चर्चा काही काळ चालली, तशीच या विवाहाची चर्चा आता दीर्घकाळ चालेल. ज्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, त्यांनी आपल्या मुलांच्या विवाहात आनंदाने खर्च करावा, अशी प्रतिक्रिया इंदुरीकर महाराजांनी दिली. पाहुण्यांसाठी पारंपरिक, सात्विक जेवणाची (गुलाबजाम आणि मट्ठा यांसारख्या काही मिठाईंशिवाय) व्यवस्था केली होती, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.
हेही वाचा
पैसा कुठून आला ते मुलाची भेट…इंदुरीकर महाराजांचं लग्नातल्या टीकेला थेट उत्तर, मनातलं सगळं बोलले!
आणखी वाचा
Comments are closed.