सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं प्रकरण
सांगली ईश्वरपूर बातम्या : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ईश्वरपूरचे (ईश्वरपूर) नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे हे अपात्र ठरले आहेत. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. पेठ-सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करुन बांधकाम केले असल्याने नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे काही महिन्यापासून याबाबतची सुनावणी सुरु होती. अखेर आज याबाबत निर्णय झाला आहे.
पेठ सांगली रोडला बसस्थानकाजवळ लॉजिंग व शॉपिंग सेंटर इमारत
महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम कलम 44(1) (e) मधील तरतुदीनुसार मलगुंडे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. भूमापन क्र. 8/1अ, 8/१अ/12, 8/1अ/13, 8/1ब व 8/2 या मिळकतीमध्ये अतिक्रमण करुन बांधकाम केले असल्याने नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांची एकत्रित मालकीची पेठ सांगली रोडला बसस्थानकाजवळ लॉजिंग व शॉपिंग सेंटर इमारत आहे. ही इमारत ही पेठ सांगली राज्यमार्गाला अगदी खेटून उभी आहे. या इमारतीच्या बांधकाम परवानगी व नियमितीकरणाबाबतची माहिती व बांधकाम नियमितीकरणाबाबतची सर्व माहिती जाधव यांनी माहिती अधिकारात मागवली होती. नंतर ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देत आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करावे, यासाठी अर्ज देण्यात आला होता. आनंदराव मलगुंडे हे गेली कित्येक वर्षे नगरपालिकेत नगरसेवक, नगराध्यक्ष व सध्याही नगराध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ही इमारत बांधली आहे असा आरोप जाधव यांनी केला होता.
शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द करण्यात आलं आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचं नगराध्यक्ष पद रद्द झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडून मलगुडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे इश्वरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अतिक्रमण व बांधकाम अनियमित प्रकरणी शिवसेनेच्या घनश्याम उर्फ जयकुमार जाधव यांनी याचिका दाखल केली होती. आता या याचिकेवर निर्णय देताना जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. आता आगामी काळात नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Comments are closed.