आमदारकी खासदारकीसाठी ठाकरेंकडे गेलो नव्हतो, मला त्यांनीच बोलावलेलं : संजय दिना पाटील
संजय दिना पाटील मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर,भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. या पक्षप्रवेशानंतर संजय दिना पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली. मी त्यांच्यासोबत राहावं असं त्यांना वाटत नाही. मी सर्वांच्या समोर जाऊन भेटतो. ते उभे राहिल्यास 10 लोक आहेत, मी गेल्यास 100 लोक उभे राहतात. मला उद्धव ठाकरे यांनी स्वत: बोलावलं होतं, मी त्यांच्याकडे पक्षात घ्या म्हणून गेलो नव्हतो, मला आमदारकी, खासदारकी द्या म्हणून गेलो नव्हतो. 2014 ला प्रताप सरनाईक एबी फॉर्म घेऊन आले होते. मी त्यांच्याकडे आमदारकी, खासदारकी द्या म्हणून गेलो नव्हतो, अशा शब्दात संजय दिना पाटील यांनी खदखद व्यक्त केली. त्या पक्षात मी कार्यकर्त्यांसाठी गेलो होतो,असं संजय दिना पाटील म्हणाले. विभागप्रमुख माझ्या कुटुंबावर जात होता, असा पलटवार संजय दिना पाटील यांनी केला. 2004, 2009 मध्ये संजय राऊत, सुनील राऊत यांनी मदत केली होती, असं संजय दिना पाटील म्हणाले.
ताकदवर लोकं नकोत, त्यांना गुलाम लोक हवीत : संजय दिना पाटील
उद्धव ठाकरे काल मतदारसंघात आले हेच जर अगोदर आले असते तर हा प्रॉब्लेम झाला नसता. मला ज्या व्यक्तीबरोबर प्रॉब्लेम होता त्याला बोलावलं असतं तर ही स्थिती झाली नसती. मी जर गेलो नसतो तर कोरम पूर्ण झाला नसता. मला बोलावून घेतलं असतं, हे झालं नसतं. मला ज्या व्यक्तीनं शिव्या दिल्या, त्याला माफी मागायला लावली असती तर हे झालंच नसतं, असा दावा संजय दिना पाटील यांनी केला.
संजय दिना पाटील पुढे म्हणाले यांना ताकदवर लोकं नको आहेत, यांना गुलाम लोक हवी आहेत. काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंबरोबर जे नेते आहेत त्यांच्याबाबत काही प्रॉब्लेम नाही. मला त्यांनी सन्मान दिला, मी पण तेवढाच दिलेला आहे. एका व्यक्तीनं ते केलेलं आहे, स्टेजवर बसून शिव्या द्यायला लागले, असं संजय दिना पाटील यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात पाहिलं असेल तुम्ही पक्षाचे मालक कोण आहेत, असा सवाल संजय पाटील यांनी केला. संजय राऊत साहेबांनी नेहमी मला मान सन्मान दिला आहे, असंही दिना पाटील म्हणाले. 2004, 2009 मध्ये त्यांनी मला मदत केली होती, ते मोठे व्यक्ती आहेत त्यांनी माझ्याबद्दल बोललं तरी मी काही बोलणार नाही. खासदार झाल्यानंतर फंड वापरु शकत नाही, शाखाप्रमुख माझ्याकडे येऊ शकत नाही. मला कार्यक्रमाला बोलावत नाहीत, असं संजय दिना पाटील म्हणाले.
मला संजय राऊत आणि पूर्ण पक्षासंदर्भात काही प्रॉब्लेम नाही, मात्र एका व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे. माझ्या घरात कोणी काय करायचं आहे ते त्यांचं ठरवायचं आहे. माझी मुलगी ठाकरेंसोबत आहे, पुतण्या भाजपमध्ये आहे. सूनबाई भाजपकडून दुसऱ्यांदा नगरसेवक आहे. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला आहे, संजय दिना पाटील यांनी म्हटलं.
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Comments are closed.