…तर ठाण्यात भाजप स्वबळावर जाण्यास मोकळे, भाजपकडून शिवसेनेला डेडलाईन, युती होणार की नाही?

संजय केळकर पोलीस स्टेशन बातम्या: राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे बुंधुंची युती झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांची युती होणार का? हा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, ठाणे महानगरपालिकेत भाजपकडून शिवसेनेला उद्याची डेडलाईन देण्यात आली आहे. उद्यापर्यंत जर चर्चेसाठी आले नाहीत तर परवा पासून भाजप स्वबळावर जाण्यास मोकळे असणार असल्याचं सुचक वक्तव्य भाजप आमदार आणि युतीच्या समितीचे सदस्य संजय केळकर यांनी केलं आहे. संजय केळकर यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

युती विना किंवा युतीसह भाजप दोन्हीसाठी तयार

युती विना किंवा युतीसह भाजप दोन्हीसाठी तयार असल्याचे मत संजय केळकर यांनी व्यक्त केले. आतापर्यंत झालेल्या चर्चेत काहीही निष्पन्न झाले नाही. शिवसेना उद्या तरी चर्चेला जाणार का? यावर ठाण्यातील युतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. युतीच्या दोन बैठका झाल्या आहेत. त्याच्यातून काय फारसं निष्पन्न झालेलं नाही. उद्याची डेडलाईन आम्ही दिलेली आहे असे केळकर म्हणाले.

युतीसाठीचा फॉर्मुला आम्ही पक्षश्रेष्ठीला दिलेला आहे : संजय केळकर

युतीसाठीचा फॉर्मुला आम्ही पक्षश्रेष्ठीला दिलेला आहे. आजच आमची बैठक झाली आहे. प्रदेश अध्यक्षांकडे जे जे काही फॉर्मुलाच्या गोष्टी आहेत. जे काही भारतीय जनता पार्टीला युती संदर्भातील तपशील त्यांना दिलेला आहे. आम्ही त्यांना सांगितले आहे की, उद्यापर्यंत निर्णय घ्यावा. आम्ही दोन्ही गोष्टीसाठी तयार आहोत. वी “आर प्रीपेड फॉर बोथ द थिंग्स” असे केळकर यावेळी म्हणाले.

ठाण्यात भारतीय जनता पार्टीने घरोघरी प्रचार सुरु केलाय

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट झाली होती. दरम्यान, अशातच संज. केळकर यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळं ठाण्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार का नाही? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. काय होईल याबाबत काळच सांगू शकतो. ठाण्याला सगळ्यांची सवय आहे. 2017 ला स्वतंत्रपणे लढले होते. त्याच्या आधी दोन वेळेला स्वतंत्रपणे लढले, तीन वेळा युती सह लढले. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही.की स्फोटक अशी गोष्ट नाही. दोन्ही साठी लोकांना सवय असल्याचे संजय केळकर म्हणाले. भारतीय जनता पार्टीने देखील त्यांच्या भागामध्ये घरोघरी प्रचार सुरू केलेला आहे असे केळकर म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.