संजय खंदारे वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव
सरकारने आज तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांची वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांची पर्यटन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय खंदारे हे सध्या पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांची आता मंत्रालयात वन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. संजय यादव हे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची पर्यटन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वैष्णवी बी. यांची नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Comments are closed.