वसंतराव नाईकांच्या वाटेवर चालणं माझं ध्येय, समाजाचं भलं होईल; मंत्री संजय राठोडांचं वक्तव्य

बीड : हरित क्रांतीचे जनक असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी दाखवलेल्या दिशेने, त्यांच्या विचारांचा शिदोरीवर दहा पावले जरी मी चाललो तरी माझ्या हातून समाजाचं भलं होईल, असं वक्तव्य राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी केलं. वसंतराव नाईक यांच्याइतकं मी मोठं होऊ शकणार नाही, परंतु त्यांच्या वाटेवर चालणं हे माझं ध्येय आहे, असंही राठोड म्हणाले. बीडच्या वडवणी येथे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संजय राठोड बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना अनेक वक्त्यांनी संजय राठोड यांच्या कामाची स्तुती केली. ‘वसंतराव नाईक यांच्यानंतर आता संजय राठोड’ अशी घोषणाही देण्यात आली. संजय राठोड यांनी वसंतराव नाईक यांच्याप्रमाणे नेतृत्व करावं अशी इच्छा काहीजणांनी बोलून दाखवली.

वसंतराव नाईकांच्या वाटेवर चालणार

या सगळ्यांवर बोलताना संजय राठोड म्हणाले की, “हात जोडून आणि पाया पडून विनंती करतो, नाईक साहेबांएवढं मोठं कोणी होऊ शकत नाही. त्यांच्या एवढं मोठं होण्याचा माझा विषय नाही. पण त्यांच्या वाटेवर चालण्याचं काम मी करणार आहे. वसंतराव नाईकांच्या विचारांची शिदोरी घेऊन, त्यांनी दाखवलेल्या दिशेने दहा पावलं जरी मी पुढे चाललो, तरी समाजाचं भलं होईल.”

ही बातमी वाचा:

Comments are closed.