कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांची SIT द्वारे चौकशी होणार का? संजय राऊत यांचा सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बारामती आणि राहुरीची पोट निवडणूक या प्रतिकात्मक आहेत. असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांची SIT द्वारे चौकशी होणार का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, बारामती आणि राहुरीची पोट निवडणूक या प्रतिकात्मक आहेत. बारामतीमध्ये कुठला मोठा पक्षही निवडणुकीच्या रिंगणात नाही. काही अपक्ष तिथे उभे आहेत म्हणून तिथे निवडणूक होत आहे. राहुरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवार दिला आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे.

तसेच पुण्यात चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. यात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृहमंत्र्यांचे अपयश आहे. मग एसआयटी त्यांची चौकशी करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पण काही झाले की एसआयटी नेमली जाते. अशा प्रकारे मुलींवर अत्याचार होणार नाहीत यासाठी काम करा. कायद्याचा धाक राहील असे पाहा. चाकण, पिंपरी चिंचवड आणि नागपूरमध्येही अशा घटना घडल्या आहेत. तुम्ही कुठे कुठे एसआयटी नेमणार आहात? एसआयटी कोणत्या कारणासाठी नेमली जाते याचे काही संकेत आहेत. असे गुन्हे करणाऱ्यांना ताबडतोब फाशीवर लटकवायला पाहिजे. तुम्ही एसआयटी नेमून काय करणार? असा लोकांच्या मनात प्रश्न आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की त्या नराधमाला फासावर लटकवा, मग माझे सांत्वन करायला या असेही संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.