भाजपच्या मर्जीनुसार मतदारसंघ पुनर्रचना आणि SIR प्रक्रिया झाली आहे, तिथे भाजपचा विजय निश्चित – संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने केंद्र सरकारने किंवा निवडणूक आयोगाने पॅरामिलटरी फोर्सने निवडणुकीचा ताबा घेतला आहे. त्यामुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होत आहे, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच भाजपच्या मर्जीनुसार मतदारसंघ पुनर्रचना आणि SIR प्रक्रिया झाली आहे, तिथे भाजपचा विजय निश्चित असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने केंद्र सरकारने किंवा निवडणूक आयोगाने पॅरामिलटरी फोर्सने निवडणुकीचा ताबा घेतला आहे. त्यामुळे ही काँटे की टक्कर होत आहे. नाहीतर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे खूप मोठे स्थान आहे असे मला वाटत नाही. जोपर्यंत पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आसामचा पूर्ण निकाल साधारणतः दोन ते तीन वाजेपर्यंत आपल्या हाती येईल. त्यानंतरच यावर मत व्यक्त केले पाहिजे. आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अजून भरपूर वेळ आहे. पण पश्चिम बंगालमध्ये भाजप स्पर्धेमध्ये आहे आणि टक्कर देतोय. ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग, भाजप, मोदी आणि शहा यांनी 90 लाख मतं मतदार यादीतून हटवली गेली आहेत. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतं हटवली जातात तेव्हा त्याचा परिणाम निकालावर होतो असे संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून होते. यावर संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीत तळ ठोकून बसणे हेच त्यांचे काम आहे. देशात किंवा राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत, भ्रष्टाचार होत आहे, महागाई वाढली आहे. यासंदर्भात काम करण्यासाठी कुणीही तळ ठोकून बसलेले नाही. पण एखाद्या राज्यात जेव्हा निवडणूक येते तेव्हा मोदी शहांचं संपूर्ण सरकार तळ ठोकून त्या राज्यात बसतं. देशाचं किंवा विकासाचं मोठं काम त्यांच्या दृष्टिक्षेपात नाही असे मला दिसत नाही. निवडणूक आयोग हा भाजपचा मित्र पक्ष आहे. आणि निवडणूक आयोग हा जर मित्रपक्ष असेल तर काहीही करू शकतात असेही संजय राऊत म्हणाले. तसेच जेव्हा जेव्हा भाजपला जिंकायचं असतं तेव्हा भाजप हातखंडे आजमावते. त्यात SIR सारखी प्रक्रिया राबवली जाते. त्यात 90 लाख मतं कापली जातात. नंतर सीसीटीव्ही गायब केले जातात, वीज घालवली जाते. एवढं असूनही पश्चिम बंगालमध्ये आता मतमोजणीची पहिली फेरी आणि पोस्टल मतदानाची मोजणी सुरू झाली आहे, त्यात अजूनही वेळ आहे.

आसाममध्ये काँग्रेसने भाजपला चांगली टक्कर दिली. जिथे जिथे भाजपच्या मर्जीनुसार मतदारसंघ पुनर्रचना आणि SIR प्रक्रिया झाली आहे, तिथे भाजपचा विजय निश्चित आहे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Comments are closed.