ईडीचे अधिकारी म्हणाले, वरती बोलून घ्या…; संजय राऊतांनी दिलं कट्टर शिवसैनिकाचा डीएनए दाखवणारं
संजय राऊत पुस्तक नरकटला स्वर्ग मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बहुचर्चित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचं आज प्रकाशन आहे. आज सायंकाळी 6 वाजता पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये तिथे होणार. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, शरद पवार, जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. पत्राचाळ प्रकरणात ईडी चौकशीनंतर संजय राऊत यांनी अर्थ रोड कारागृहात शंभर दिवस तुरुंगवास भोगला. यावेळी कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. संजय राऊतांनी तुरुंगातील अनुभव यामध्ये मांडले आहेत. अनेक राजकीय दृष्ट्या खळबळजनक दावे या पुस्तकात पाहायला मिळताय. शिवाय काही गौप्यस्फोटसुद्धा या पुस्तकात करण्यात आले आहेत. एबीपी माझाच्या हाती या पुस्तकाची प्रत आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडायला मदत करा, नाहीतर तुरूंगात जावं लागेल…अशी धमकी भाजपकडून देण्यात आली होती असा दावा खासदार संजय राऊतांनी पुस्तकात केला आहे. राऊतांचं नरकातला स्वर्ग नावाचं पुस्तक आज प्रकाशित होतंय. या पुस्तकात राऊतांनी हे खळबळजनक दावे केलेत. काल मोदी आणि शाह यांना पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या मदतीचे पुस्तकातले दावे माझाने उघड केले होते. आता आज एबीपी माझा राऊतांच्या पुस्तकातला हा आणखी एक खळबळजनक दावा घेऊन पुढे आलंय. भाजपमधील एका हितचिंतनाने आपली भेट घेतली आणि आपल्याला हा इशारा दिला असं राऊतांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय.
संजय राऊतांनी ईडीच्या अधिकाऱ्याला कट्टर शिवसैनिकाचा डीएनए दाखवणारं उत्तर दिलं-
‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातील काही महत्त्वाचे खुलासे समोर आले होते. यात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी संकटकाळी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना संकटकाळी कशाप्रकारे मदत केली याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आता पुस्तकातील नवीन खळबळजनक खुलासा समोर आला आहे. आपल्यावरील कारवाईबाबत ईडी अधिकाऱ्यांवर वरून कोणाचा तरी दबाव होता असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. ईडी अधिकाऱ्याने वरती बोलून घेण्याचा सल्लाही संजय राऊतांना दिला होता, असं राऊत आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात म्हणतात. मात्र आपल्या वरती केवळ बाळासाहेब ठाकरे आहेत असं राऊत यांनी त्या अधिकाऱ्याला सुनावलं असं त्यांनी पुस्तकार नमूद केलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=AZCPGADLSLW
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.