अशी कर्मकांड केली असती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं; मांसबंदीच्या निर्णयावरून राऊतांचा फडण
देवेंद्र फड्नाविसवरील संजय रौत: राज्यातील अनेक महापालिकांनी 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद (Meat Ban) ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वाद उद्भवला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकारण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 15 ऑगस्टला मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा हा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला निर्णय नाही, तर 1988 रोजी तत्कालीन सरकारच्या काळात घेतलेला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, महापालिका सरकारची नसते हे आज आम्हाला कळलं. महापालिकेवर प्रशासक कोणाचा आहे? राज्यातल्या 27 महापालिका सध्या फडणवीसांच्या खाजगीरित्या ताब्यात आहेत. सरकारचा निर्णय नाही हे म्हणणं म्हणजे प्रशासनासंदर्भात कमी माहिती असणे आहे. ते दोनदा, तीनदा मुख्यमंत्री झालेत. त्यांनी अशी फुटकळ विधाने करू नये, असा हल्लाबोल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
अशी कर्मकांड केली असती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं
संजय राऊत पुढे म्हणाले की, तुम्ही जर निर्णय घेतला असेल तर तो का घेतला? हे लोकांना पटवून द्या. स्वातंत्र्य दिन सोहळा हा विजय उत्सव आहे. त्याच्यासाठी उपवास धरणे, अमुक करणे, तमुक करणे अशी कर्मकांड चालत नाही. अशी कर्मकांड केली असती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं. भाजपच्या नेत्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग यांचे साहित्य वाचावं लागेल. फालतू आदेश काढून त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं नाही. अनेक संप्रदाय राज्यात शाकाहारी आहेत. त्यांचा सन्मान केला पाहिजे. तरी देखील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे सैन्य शाकाहारावर चालत नाही. त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो. एखाद्याच्या आहारावर अशी बंदी तुम्ही आणू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत
शिवसेना-मनसे युतीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रात वेगळ्या घडामोडी घडत आहेत, खास करून मुंबईसाठी घडत आहेत. त्या संदर्भात आम्ही दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांशी देखील चर्चा केली आहे. महाराष्ट्राची राजधानी गुजरातच्या ताब्यात जाता कामा नये. महाविकास आघाडीच्या नेत्यांची हीच भूमिका आहेत. उद्धव आणि राज हे दोघे भाऊ आहेत, ते एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्राने त्यांचं स्वागत केलं आहे, असे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
Nitesh Rane : सरकार आणण्यात हिंदूंचा हात, दुसऱ्या धर्मियांनी मतदान केलं नाही: नितेश राणे
आणखी वाचा
Comments are closed.