तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फड
संजय राऊत: पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (Dattatray Gade Arrested) याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेतले आहे. तर बलात्काराच्या प्रकरणावर गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी तरुणीने आरडाओरड, विरोध केलाच नाही म्हणून आरोपीला गुन्हा करता आला, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी देशात अशा घटना घडत असतात. कारवाई सातत्याने चालूच असते, असे म्हटले होते. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, एका महिलेवर-मुलीवर होणाऱ्या अशा पद्धतीच्या घटना यांना सामान्य वाटत असतील, तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे. काल राज्याचे गृह राज्य मंत्री म्हणाले की, बलात्कार हा शांतपणे सुरू होता. त्या मुलीने स्ट्रगल केलं नाही. तिने शांतपणे होवू दिलं. सगळ मग आम्हाला कस कळणार? महिलांवरील अत्याचारासंदर्भात मंत्री किती असंवेदनशील आहेत. मग बलात्काराला राजमान्यता द्या, कॅबिनेटमध्ये असा ठराव मंजूर करावा, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
संजय सावकारे आणि योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा
संजय राऊत पुढे महाले की, विरोधी पक्षाने आवाज उठवला म्हणून तर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरून आरोपीचा शोध घेतला. संजय सावकारे हे मंत्रीच आहेत. अशा घटना होत असतात, असे त्यांनी म्हटले. आमच्या आर. आर. पाटील यांनी बडे शहर मे छोडी घटना होती है, असे म्हटल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. संजय सावकारे आणि योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे. इतके असंवेदनशील लोक जर तुमच्या मंत्रिमंडळात असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला हवा, असेही त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.