फडणवीस त्यांच्या पदावर राहणार की नाही? एकनाथ शिंदेंनी रहस्यमय वातावरण तयार केलंय; संजय राऊतांचा

देवेंद्र फडणवीसांवर संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) मुळे मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आता केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपदे मिळण्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर, सोमवारी रात्री उशिरा तानाजी सावंत आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची महत्त्वाची भेट घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. आता या सर्व घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केला.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की: “ओम निंबाळकर सोंगाड्या आहे. मला देवेंद्र फडणवीस यांचं आश्चर्य वाटतं की, विरोधी पक्षात असताना त्यांना तुम्ही भेटी देत नाहीत. त्यांनी आणलेल्या विकासकामांच्या कागदांवर तुम्ही चर्चा करत नाहीत. पण एखाद्याने पक्षांतर केले की तुम्ही त्यांना समोर बसवतात. त्याचे कागद मंजूर करतात, देवेंद्र फडणवीस हा घटनेशी द्रोह आहे. म्हणूनच त्याची कर्माची फळ तुम्हाला मिळताय. उद्धव ठाकरेंनी सांगितलं ‘ऑपरेशन देवेंद्र’ सुरु झालंय. काही काळापासून देवेंद्र दिल्लीत जाणार, उच्च पदावर जाणार या चर्चांना त्यांच्या वागणुकीमुळेच आता पूर्णविराम मिळाला आहे. आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात त्यांच्या पदावर राहतील की नाही अशा प्रकारचे रहस्यमय वातावरण मिध्यांनी निर्माण केले आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे,” असे त्यांनी म्हटले.

Sanjay Raut On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस हे घटनाद्रोही

संजय राऊत पुढे म्हणाले की, “या लोकांचे राजीनामा घेतले पाहिजे, कायद्याने हे अपात्र ठरले पाहिजेत. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार त्या लोकांची खासदारकी रद्द व्हायला पाहिजे असे घटना आणि कायदा सांगते. पण पक्षांतर केलेल्या गुन्हेगारांना देवेंद्र फडणवीस आपल्या चेंबरमध्ये बसवून त्यांना जनतेच्या पैशाने चहा बिस्कीट देऊन त्यांच्या कागदावर सह्या करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे घटनाद्रोही आणि रामद्रोही आहेत. ओम निंबाळकरांपासून सगळे लोक हे राज्याचे आणि जनतेचे गुन्हेगार आहेत. अशा गुन्हेगारांना तुम्ही पद देणार असाल, निधी देणारा असाल तर मग आधी का दिला नाही? जनता तीच होती आणि खासदार पण तेच होते. मग आधी का दिला नाही? हे घटनेचे राज्य नाही. याची किंमत या सर्वांना चुकवावी लागेल,” असा इशारा देखील त्यांनी दिलाय.

आणखी वाचा

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026: नीलम गोऱ्हे नव्हे, उपसभापतीसाठी शिवसेनेतून 2 जणांमध्ये चुरस; एकनाथ शिंदेंचं पुन्हा धक्कातंत्र?, स्मार्ट खेळीकडे सगळ्यांचं लक्ष

Comments are closed.