राज्याची अवस्था नेपाळसारखीच, जात विरुद्ध जात भांडण लावताय, लोकांच्या संयमाचा बांध तुटतोय; संजय
संजय राऊत: लोकप्रिय घोषणामुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. या वर्षाअखेरीस राज्याचा कर्जाचा बोजा नऊ लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणूक काळात केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढत चालल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज्य सरकारवर (Maharashtra Government) जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात जे राज्य 24 हजार कोटीचं कर्ज घेत आहे. त्या राज्याची अवस्था ही नेपाळ सारखीच आहे. बेरोजगारी, विकासाची काम ठप्प आहेत. फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून एसआरएची काम सुरू आहेत. त्यांना ते काम मिळत आहेत. एसएसआय विकला जातोय, त्यातून पैसे मिळत आहेत. कबुतरांना दाणे टाकण्याचे काम सुरू आहे. या पलीकडे महाराष्ट्रात कुठलेही काम चालू नाही. जात विरुद्ध जात असे भांडण लावून लोकांचं लक्ष विचलित केला जात आहे. फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जात आहे. शिक्षणापासून रोजगारापर्यंत महाराष्ट्राने या सरकारच्या काळात काय प्रगती केली? याविषयी एकदा मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे पत्रकारांची संवाद साधला पाहिजे. इतकी लुट या महाराष्ट्रात होत आहे. त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर दहा लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर झाला आहे. राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधीच झालेली नव्हती, असा हल्लाबोल त्यांनी केला.
अजित पवार काही भाष्य करणार आहेत का?
आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार यावर काही भाष्य करणार आहेत का? त्यांना आर्थिक शिस्तीची फार काळजी असते. पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा, हे त्यांचे धोरण आहे. मग ते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून असेल किंवा अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील. दुसरे ते डाकू अमित शाह यांच्या कृपेने बसलेले आहेत. डाकू मानसिंग हे शाहांच्या कृपेने चंबळ खोऱ्यातून आले आहेत. महाराष्ट्रातील पुढच्या पिढीचे काय होणार? नऊ लाख कोटींचे कर्ज कोणी केले आणि का झाले? कोणत्या योजनांमुळे झाले? चारही बाजूने महाराष्ट्र ओरबाडला जात आहे. जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्यातरी खिशात जात आहे. हा पैसा कुठे जात आहे? कोणत्या राजकीय पक्षाकडे जात आहे? कोणत्या नेत्याच्या किंवा त्या नेत्याच्या गटाकडे जात आहे? याबाबत महाराष्ट्राला चिंता लागून राहिली आहे, असा देखील संजय राऊत म्हणाले.
लोकांच्या संयमाचा बांध तुटतोय
संजय राऊत पुढे म्हणाले की, आम्ही नेपाळच्या संदर्भात बोललो की मिरच्या झोंबतात. मग मला माओवादी, नक्षलवादी ठरवतात. पण नेपाळ असाच राज्यकर्त्यांनी लुटला. त्यातून जो उद्रेक झाला तो अत्यंत धक्कादायक होता. त्याचे समर्थन मी करत नाही. पण लोकांच्या संयमाचा बांध इथे तुटत आहे. राज्यावर दहा लाख कोटींचा कर्ज आहे. या राज्याला तुम्ही प्रगतीपथावरचे राज्य म्हणतात. अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी आणल्या आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाहीत. अधिक कर्ज घ्या, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. फक्त नाशिक जिल्ह्यात दोन हजारांच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, असे देखील त्यांनी म्हटले.
सर्वात मोठा भ्रष्टाचार मंगल प्रभात लोढा यांच्या विभागात
शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही, हमीभाव देत नाही. मग जे कर्ज झाले ते लाडकी बहीण योजनेसाठी झाले असेल तर ते तुमच्या खिशातून द्या. कारण यात देखील भ्रष्टाचार झालेला आहे. लाखो खातेदार बेकायदेशीर आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. सर्वात मोठा भ्रष्टाचार मंगल प्रभात लोढा यांच्या कौशल्य विकास विभागात होत आहे. लाखो बोगस नाव आहेत, ज्यांना कौशल्य विकास योजनेतून दर महिन्याला पैसे दिले जातात. हे सगळेच भाजपचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.
https://www.youtube.com/watch?v=lzgsbklwuus
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.