राज ठाकरेंपासून एकनाथ शिंदेंपर्यंत…; संजय राऊतांच्या आजच्या पत्रकार परिषदेतील 5 महत्वाचे मुद्
संजय राऊत राज ठाकरेंवर मुंबई : 2017 साली वोटिंग मशीन आणि मतदार याद्यांसंदर्भात मी पत्रकार परिषद घेतली होती. पण त्यावेळी अनेकांना त्याचं गांभीर्य समजलं नव्हतं. पुढे होणाऱ्या निवडणुकांसाठी जवळपास 96 लाख खोटे मतदार यादीमध्ये भरले आहेत. अशा निवडणुका जर आपल्या देशात होणार असतील तर कशासाठी निवडणुका लढवायच्या, पैसे खर्च करायचे आणि मतदान करायचं?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर आज (20 ऑक्टोबर) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे.
संजय राऊतांच्या आजच्या पत्रकार परिषदमधील महत्वाचे मुद्दे- (Sanjay Raut PC)
- काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये विशेषतः खास करून निवडणूक आयोग निवडणूक यादीमधील घोटाळे निवडणूक यंत्रणेचा भ्रष्टाचार यावर भाष्य केलं. याच्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे,आजही महाराष्ट्रातल्या निवडणूक मतदार यादीमधील साधारण 96 लाख मतदार बोगस आहेत.ज्याला आपण राऊंड फिगर म्हणतो ते एक कोटी एक कोटी मतदार बोगस असल्यामुळे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदार यांच्या हातामध्ये आहे.
- आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये चार दिवसात साडेसहा लाख मतदान वाढवले हा काय प्रकार आहे.अमित शहा म्हणतात दोन दिवसांपूर्वी दिल्लीत आम्ही घुसकरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असेल तर आम्ही त्यांना हाकलून देऊ…मतदार यादीतून महाराष्ट्रामध्ये एक लाख बोगस मतदार आणि घुसकोर आहे असे आम्ही मानतो अमित शहा यांनी एक कोटी मतदार घुसखोर विजय तुमच्या भाजप मिंधे लोकांनी घुसवले आहेत.
- मतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाही आणि त्यासाठी देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं त्यात काल घोषणा झाली.
- काल शिवसेना भवनात पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय नेते होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते काँग्रेसचे नेते हजार होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते आणि आता हळूहळू त्या संदर्भात पाऊल पडत आहेत.
- निवडणूक आयोग कार्यवाही करेल हे कोणत्या भरोशावर युतीफुटी बोलत आहे. निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी म्हणून दोन दिवस 14-15 तारखेला शिस्त मंडळ भेटलं काय कारवाई केली पुरावे दिले.
- विधानसभा लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान आहे 46 लाख, 50 लाख ते एकाच पक्षाला कसं काय पडू शकतं का? दुसरं कोणी येथे निवडणुकीला उभे नव्हते का? ज्या चोराला रंगे हात पकडला आहे तो चोरच पुरावा मागत आहे आणि चोर पुरावा कोणाकडून मागत आहे हे चोर आहेत. यांनी चोरा केलेल्या आहेत.
- आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही, आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे ते उत्तर देतील. भारतीय जनता पक्षाला किंवा मिंधे यांना मिरच्या का लागत आहे. त्यांचे तडतड का होत आहे? याच्यातच एक मराठीमध्ये फार मन आहे चोराच्या मनात चांदणे आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला जसे केंद्रात राहुल गांधी सवाल विचार होते. निवडणूक आयोगाला उत्तर कोणते आहे तर भाजपचे नेते काय गरज आहे?
- जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असेल मिंधे उत्तर देत असेल याचा अर्थ निवडणूक आयोगाने या सगळ्यांची मिली बघत आहे.
- जे सरकार गुवाहटीमध्ये रेड्यांचे बळी दोन निर्माण झालं त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता…ज्या देशाचे पंतप्रधान ज्या राज्याचे मुख्यमंत्री हे विज्ञानापेक्षा तंत्र मंत्र याच्यावरती अवलंबून राहतात त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता…पंडित नेहरूंनी हा देश विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे नेला तितकंच हे मागे आणून लोकांना अंधश्रद्धामध्ये गुंतवून ठेवत आहेत. काय अपेक्षा करणार त्यांच्याकडून तुम्ही 50 रेड्यांचे बळी देऊन सरकार जे सत्तेमध्ये आला आहे त्यांच्याकडे दुसरी काय अपेक्षा…
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन मराठी माणसाच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून उभं केलं, अशा वेळेला मराठी माणूस तिथे येणार असेल…पक्षभेद-मतभेद विसरून येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे. काल मनसेचे सर्व नेते तिथे आले ते भारावले होते. त्या वास्तेमध्ये त्यातले काही नेते प्रथमच इथे आले. राजू पाटील वगैरे त्यांच्यासाठी फार मोठ्या भावनिक क्षण होता.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.