विधान परिषदेच्या फोडाफोडीवर एका दिवसात 150 कोटी खर्च झाले, हे लोकशाहीला घातक; संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बिनविरोध निवडणुका जिंकण्याचा भाजप महायुतीचा पॅटर्न महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकांतही दिसून आला. विधान परिषदेचे अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीच्या सहा उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने ठाणे, रायगड, पुणे, यवतमाळ, चंद्रपूर, अहिल्यानगर येथील उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

”काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान १५० कोटी रुपये खर्च झाले. विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे. कोकण, छत्रपती संभाजी नगर, पुणे येथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत”, असे संजय राऊत यांनी X वर पोस्ट केले आहे.

माघारीमुळे हे झाले विजयी

अनिकेत तटकरे
रवींद्र फाटक
विक्रम काकडे
अरुण लखानी
दुष्यंत चतुर्वेदी
प्राजक्त तनपुरे

Comments are closed.