उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर भावासारखं प्रेम केलं, पण हे भोसxxx यांच्या अंगात गद्दारी भिनलीय; संजय

ऑपरेशन टायगरवर संजय राऊत: उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या सहा फुटीर खासदारांवर खासदार संजय राऊत यांनी बुधवारी टीकेची जोरदार तोफ डागली. बाळासाहेबांनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, उद्धवजींनी भावासारखं प्रेम दिलं, त्यांच्यासोबत यांनी गद्दारी केली. हे साss, भोसxxx, यांच्या अंगात गद्दारी भिनली आहे, अशा शेलक्या शब्दांत संजय राऊतांनी (Sanjay Raut) फुटीर खासदारांना लक्ष्य केले. तुम्ही आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीने निवडून आले असताना कोणालाही बेईमानी करण्याचा अधिकार नाही. मागे जे झाले त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर महाराष्ट्राची जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाही, जो राडा व्हायचा तो होईल. खासदार पक्ष सोडून गेले तर आता आम्ही शांत बसणार नाही. ज्यांना जायचं आहे त्यांनी राजीनामा द्या, आमच्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेत, आमच्या मतदारांमुळे निवडून आला आहात, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Operation Tiger in Maharashtra)

या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अनेक खळबळजनक आरोप केले. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या खूनाचा खटला सुरु आहे. त्याचा निकाल लवकरच येणार आहे. हा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर आमच्या पक्षात या, अशी ऑफर ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. काल रात्री मला 10.30 ते 11 वाजता महत्त्वाच्या व्यक्तीने मला फोन केला. तो म्हणाला की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतले जात आहे. मी त्याला विचारले भाव काय आहे. तो म्हणाला तोच 50 कोटी रुपयांचा हमीभाव आहे. यापैकी 15 कोटी आज रात्री दिले जाणार आहेत. त्याशिवाय हे खासदार विमानात बसायला तयार नव्हते. अशाप्रकारे पक्ष फोडले जात असतील तर देशात निवडणूक लढण्याला अर्थ नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. हे सर्व खासदार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.

Shivsena Meeting in Mumbai: मातोश्रीवरच्या बैठकीत एका खासदाराने चारवेळा साईबाबांची शपथ घेतली: संजय राऊत

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मातोश्रीवर 14 जूनला झालेल्या बैठकीचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, 14 तारखेच्या बैठकीला लोकसभेचे चार खासदार बैठकीला उपस्थित होते. यामध्ये अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील उपस्थित होते. उर्वरित पाच जण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजर होते. त्यांनी उद्धव ठाकरेंना आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले. एका खासदाराने चारवेळा साईबाबांची शपथ घेतली. मी तुमच्यासोबत आहे, साईबाबांची शपथ घेतो; माझी बायको आजारी आहे, साईबाबांची शपथ घेतो, मी दोन दिवसांत भेटायला येतो, साईबाबांची शपथ घेतो, मी मरेपर्यंत तुमच्यासोबत राहतो, साईबाबांची शपथ घेतो, असे या खासदाराने म्हटले. एकाने त्याच्या मुलीची तर आणखी एकाने आई भवानीची शपथ घेतली. अशा शपथा घेतल्यावर विश्वास ठेवणे अनिवार्य होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

आणखी वाचा

Operation Tiger UBT Shivsena: आईबाबा अन् साईबाबा सगळ्यांच्या शपथा फेल, ठाकरेंचे खासदार फोडले, एकनाथ शिंदेंनी रात्री सगळ्यांना चकवून काय केलं?

Comments are closed.