तुम्ही फक्त मोदींचं भजन करताय, लोकांची अवस्था बघा, ते हवालदिल झालेत; गॅस टंचाईवरून संजय राऊत फड

देवेंद्र फडणवीसांवर संजय राऊत इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात उद्भवलेल्या गॅस टंचाईच्या संकटावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ट्रम्प म्हणतोय मला इराणवर बॉम्ब टाकायला मजा येते आहे. माणसं मारायला ज्या माणसाला मजा येतेय. त्या माणसाच्या राष्ट्राशी मोदींनी गुलामीचा करार केला, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तर, तुम्ही फक्त मोदींचं भजन करताय, काही नाही.. काही  नाही… काही नाही… लोकांची अवस्था बघा काय आहे बाहेर, लोक हवालदिल झालेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

संजय राऊत म्हणाले की,  माझं मुख्यमंत्री यांना आव्हान आहे की खोटं बोलू नका. एक महिना पूरेल एवढं इंधन आहे, असं खोटं का सांगत आहात? ट्रम्प म्हणतोय मला इराणवर बॉम्ब टाकायला मजा येते आहे. माणसं मारायला ज्या माणसाला मजा येतेय. त्या माणसाच्या राष्ट्राशी मोदींनी गुलामीचा करार केला. इंधनाची टंचाई आहे, गॅसची टंचाई आहे हे मान्य केलं पाहिजे. मुंबई सारख्या मोठ्या शहरात 40 टक्के हॉटेल व्यवसाय बंद पडलाय. कामगार गावाकडे परतत आहेत. अनेक तीर्थ क्षेत्रात प्रसादाची कपात केली आहे हे मान्य केलं पाहिजे. फक्त मोदींच्या नावाने भजन करुन आणि धार्मिक भावना निर्माण करुन इंधन तुटवडा आणि युद्ध संपणार नाही. एलपीजी गॅसच्या रांगा थांबणार नाहीत. हे भाजपने एकदा आत्मचिंतन करुन समजून घ्यावे, असे त्यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीसांवर संजय राऊत: तुम्ही फक्त मोदींचा जप करत आहात

संजय राऊत पुढे म्हणाले की,  आम्ही काही बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झोंबतात. मोदींची बदनामी करतो, असे ते बोलतात. मोदी स्वत:ची आणि देशाची बदनामी करत आहेत. प्रचाराला वेळ आहे पण गॅस टंचाईवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यायला त्यांना वेळ नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही भूमिका घायला पाहिजे. सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र बोलवून चर्चा करणे गरजेचे आहे. दोन्ही विधिमंडळात याबाबत चर्चा केली पाहिजे. त्यासाठी दोन्ही विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक केली पाहिजे. पण तुम्ही ते करत नाहीत. तुम्ही फक्त मोदींचं भजन करताय, काही नाही.. काही  नाही… काही नाही… लोकांची अवस्था बघा काय आहे बाहेर, लोक हवालदिल झालेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

संजय राऊत वर पीएम मोदी: देश मेला तरी चालेल, देशाची जनता रांगेत उभी राहू द्या. पण…

पुढील दोन महिन्यांसाठी गुजरातला पुरेसे तेल उतरवले जाईल. गॅस उतरवला जाईल. आम्ही सांगितल्याप्रमाणे जहाजं गुजरातला गेली की नाही? आधी गुजरातला माल उतरवला जाईल, मग उरलेला देश. देश मेला तरी चालेल, देशाची जनता रांगेत उभी राहू द्या. पण, मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत. अमित शाह हे गुजरातचे गृहमंत्री आहेत. बाकीचा देश विरोधकांचा छळ करण्यासाठी आहे, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केलीय.

आणखी वाचा

Supriya Sule On Baramati By Election 2026: बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचं नाव पुढे; शरद पवारही उमेदवार देणार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

आणखी वाचा

Comments are closed.