अभिजीत दिपकेंना विरोध करणारे आहेत ते खरे संघवादी नाहीत, ते पेड लोकं आहेत – संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कॉक्रोच जनता पार्टीकडून ‘ज्ञानेश कुमार हटाव’ अशी मागणी करीत छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आंदोलन पुकारले आहे. शुक्रवारी अभिजीत दिपके छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे गेले असता काही लोकांनी त्यांना घेराव घालत आंदोलन करू नका, आम्हाला त्रास होतो असे सांगितले. या लोकांमध्ये माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे पीए देखील होते. या प्रकरणावर बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अभिजीत दिपकेंना विरोध करणाऱ्या लोकांवर टीका केली आहे.

”अभिजीत दिपके शिवाजी पार्कमध्ये गेले तेव्हा भाजपच्या पोसलेल्या लोकांनी त्यांना विरोध केला. त्यात एक प्रकाश बिलगवडे हे धर्मेंद्र प्रधान यांचे पीए होते. व्हिडीओत ते स्पष्ट दिसत आहेत. विरोध करून ते थेट आशीष शेलारांच्या बाजूला जाऊन बसले. हे सगळे जे उतरले होते ते सगळे भाजपने लोकशाही, संविधानविरोधी उतरले होते. भ्रष्ट ज्ञानेश कुमार यांना हाकला, निवडणूक प्रक्रीया निष्पक्ष आणि पारदर्शक करा या मागणीसाठी दिपके आंदोलन करतायत यात त्यांना त्रास व्हायचं कारण काय? ते म्हणतात शांतता हवी आहे. मोदी-शहा-फडणवीस या देशातील लोकशाहीचा गळा दाबतायत. आमचा आवाज दाबून त्यांना शांतता हवी आहे का? या पाच पन्नास लोकांना छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा इतिहास माहित नाही. शिवाजी पार्क जेव्हा जेव्हा शांत झालं तेव्हा तेव्हा या महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा आवळला गेला. या शिवाजी पार्कमधून जेव्हा जेव्हा असंतोषाची ठिणगी पडली तेव्हा तेव्हा देश पेटला. स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्टाराच लढा, शिवसेनेची स्थापना. बाळासाहेबांच्य़ा गर्जना. एवढंच काय इंदिरा गांधी विरोधात जो जनता पक्ष स्थापन झाला. त्या आणिबाणीविरोधातील अनेक लढे शिवाजी पार्कवर लढले गेले त्यामुळे ही कालची पंचवीस तीस लोकांची पिलावळ जिवंत आहे. त्यांना समजायला पाहिजे हे. अभिजीत दिपकेंना विरोध करणारे आहेत ते खरे संघवादी नाहीत, ते पेड लोकं आहेत. जनता या लढ्यात उतरली आहे. नीट विरोधात जे लढे झाली त्यात जनता सुद्धा सहभागी झाली होती. प्रत्येक संघर्षात जनता शिवसेनेसोबत राहिली आहे. सगळे लढवय्ये लोकं या भागात राहतात. हे सगळं या लोकांना माहित नसेल त्यांनी याची चिंतन बैठकीत माहिती करून घ्यावी”, असे संजय राऊत म्हणाले.

” महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट आहे आणि तुमच्या तिजोरीत खडखडाट आहे. दुष्काळाशी सामना करायला त्यांना चाळीस हजार कोटींचं कर्ज घ्यावं लागतंय ही नामुष्की आहे. काय करतायत हे मंत्री. मंत्री वगैरे काही दौरे करत नाहीये, ते नाटक करतायत त्यांची क्षमता नाही दौरे करण्याची. ठेकेदारांची व काही मंत्र्यांना चाळीस टक्के कमिश मिळावं म्हमून शक्तीपीठाचा घाट घातला आहे. अशा प्रकारच्या कामांना रोखणं गरजेचं आहे. कारण कर्ज काढून तुम्ही दुष्काळाशी लढणार आहात. हे काम रोखलं तर किमान एक कर्ज तरी कमी होईल, असा टोला संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

Comments are closed.