रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही; संजय शिरसाटांची भूमिका, महायुतीत जुंपली
रवींद्र चव्हाण यांच्यावर संजय शिरसाट : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election) अद्याप जाहीर झालेली नसली तरी महापौरपदाच्या दाव्यांमुळे महायुतीत खडाजंगी सुरू झाली आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी, “मुंबईत महायुतीची सत्ता येणार, महापौर भाजपचाच” असे ठाम विधान केले आहे. 2017 मध्ये थोडक्यात गमावलेले महापौरपद या वेळी कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार भाजपने केल्याचे दिसून येत आहे. मात्र रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे.
Sanjay Shirsat on Ravindra Chavan: रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही
भाजपने महापौरपदाचा दावा केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर पलटवार केलाय. “मुंबई महापालिकेच्या महापौरपदाबाबत रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याला आम्ही फारसे महत्त्व देत नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. जोपर्यंत युती होत नाही, तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही. शक्य झाले तर युतीमध्येच निवडणुका लढवायच्या आहेत. जो पर्यंत युती होत नाही तो पर्यंत याला गांभीर्याने घेणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आता संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर रवींद्र चव्हाण काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Mahayuti: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत जुंपली
दरम्यान, शिंदे गटाने अनेक माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात सामील करून ताकद वाढवण्याचे धोरण राबवले आहे. त्यातच अजित पवार गटही या निवडणुकीत महत्त्वाचा वाटा उचलण्यास उत्सुक आहे. त्यामुळे महायुतीतील तीनही पक्ष महापौरपदासाठी आपापला दावा मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत तणाव वाढताना दिसत आहे. दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसेमध्ये एकत्रित लढण्याबाबत पडद्यामागील हालचाली सुरू असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. त्यामुळं मुंबई महापौरपदाची लढाई रंगतदार होणार असल्याचे दिसून येते.
Congress on BMC Election: काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. मुंबई काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी ही घोषणा केली. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणत्याही आघाडी न जाण्याचा निर्णय काँग्रेसने अधिकृतपणे घेतला आहे. याबाबत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “मुंबई काँग्रेसच्या वतीने ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढवावी, अशी आमची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबत आमची युती कायम आहे आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करू,” असे त्यांनी सांगितले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.