संकल्प, गजानन उपांत्यपूर्व फेरीत
संकल्प स्पोर्ट्सला श्री सरस्वती संघाकडून पराभवाचा धक्का बसला असला तरी त्यांनी दोन विजयांसह 44 व्या उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या ‘ब’ गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तसेच गजानन, रणील, सिद्धिविनायक क्रीडा मंडळानेही अंतिम आठ संघांत स्थान मिळवत ‘अ’ गटातही स्वतःचे स्थान निश्चित केले आहे.
नगरसेवक सुनील मोरे यांच्या पुढाकाराने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि सुधीर मोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत पुरुषांच्या ‘ब’ गटाच्या साखळी लढतीत आज संकल्प स्पोर्ट्सला श्री सरस्वतीकडून 32-26 असा पराभव सहन करावा लागला. तसचे सिद्धार्थ क्रीडा मंडळाने गुड मार्ंनगचा 29-15 असा तर न्यू एकता मंडळाने रामेश्वर मंडळाचा 17-8 असा फडशा पाडला. या गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या आठ संघांना ‘अ’ गटातही खेळण्याची संधी मिळणार आहे. महिला गटात श्री साई क्रीडा मंडळाने सह्याद्री क्रीडा मंडळाला 29-17 असे नमवत विजयी सलामी दिली. याच गटात स्नेहविकास मंडळाने विशाल स्पोर्ट्सचा 34-9 असा धुव्वा उडवला.
Comments are closed.