संतोष देशमुख प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी; आरोपींची चार्जफ्रेम लागणार? धनंजय दे

संतोष देशमुख प्रकरण: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज ( 19 मे) बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे . या सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख न्यायालयात उपस्थित झाले आहेत . आज चार्ज फ्रेम झाली पाहिजे ; आरोपींना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी धनंजय देशमुख यांच्या वकिलांनी केली असून त्यावर आज सुनावणी होईल . 2 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना ज्या मागण्या दिल्या होत्या त्यावर अद्याप कारवाई झालेली नसून संतोष देशमुख यांची  अमानुषपणे हत्या करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे .आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे .

9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती . या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येला पाच  महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असून अजूनही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे . मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींवर चार्ज फ्रेम झाली पाहिजे.या मागणीवर आज आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम आजच्या सुनावणीला गैरहजर आहेत. न्यायालयात सरकारी वकिल काय युक्तीवाद करतात? मागील सुनावणीच्या वेळी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांच्याकडून न्यायालयात डिस्चार्ज एप्लीकेशन करण्यात आले होते. त्यावर काय निर्णय होतो हे पाहणंही महत्वाचं राहणार आहे..

धनंजय देशमुख काय म्हणाले ?

संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली . यातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी व देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे . आज चार्ज फ्रेम व्हायला पाहिजे .मागच्या वेळेस कोर्ट रजेवर असल्यामुळे ती तारीख पुढे दिलेली  . ती तारीख आज आहे .  आरोपींच्या वकिलांनी काही एप्लीकेशन दिलेले आहेत त्यावर आज सुनावणी होईल .

दरम्यान परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील निर्णय घेतील .आरोपींना अभय दिले जात असून सुडाची भावना ठेवली जात आहे . आरोपीचे फोटो कुणासोबत आहे. हे दिसत असून प्रत्यक्षात कारवाई झाली पाहिजे.. तर बीड मधील जेलच्या सीसीटीव्हीची मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

हेही वाचा:

Ajit Pawar: अजित दादांनी कंत्राटदाराला धरलं धारेवर; वैजनाथ मंदिराच्या पायऱ्यांच्या मुद्यावरून सुनावले खडे बोल

अधिक पाहा..

Comments are closed.