वारकरी संप्रदाय देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी, ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

संतोष देशमुख हत्येचा खून: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) आज धनंजय देशमुख यांच्यासह मस्साजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन (Annatyag Protest) करत आहेत. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी. आरोपींना शिक्षा देऊन कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान, या मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाने पाठिंबा दिला आहे. वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवित अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला आहे.

वारकरी संप्रदाय देशमुख परिवाराच्या पाठीशी उभा

संतोष देशमुख यांची हत्या घडलेल्या घटनेला 77 दिवस झाले आहेत. या कुटुंबावर दुःख ओढवले आहे.  त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, महाराष्ट्रातील पहिली घटना आहे, या घटनेमुळं एका कुटुंबाला न्याय मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावे लागत आहे असे भागचंद महाराज झांजे म्हणाले. ही घटना निंदनीय आहे, न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार असल्याचे झांजे म्हणाले. वारकरी संप्रदाय देशमुख परिवाराच्या पाठीशी उभा आहे. महंत नामदेव शास्त्री यांनी प्रसार माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया वादग्रस्त ठरली होती. वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. महंतांनी ज्यांच्यावर अन्याय झाला त्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहिला पाहिजे होते. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी देशमुख कुटुंबाच्या मागे उभा राहिला पाहिजे. प्रत्येकाने या कुटुंबाच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे असे मत भागचंद महाराज झांजे यांनी व्यक्त केले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या तपासाच्या कार्यशैलीवर पहिल्यापासून संशय व्यक्त करण्यात येत आहे. आधी प्रकरणात काय तपास चालू आहे हे कुटुंबीयांना कळवत नाहीत अशी तक्रार होती .त्यानंतर आरोपींना मदत केल्याचा आरोप करण्यात आला . आज अन्नत्याग आंदोलना दिवशी पोलीस अधीक्षकांची झालेल्या चर्चेदरम्यानही पोलिसांची भूमिका असमाधानकारक असल्याचं धनंजय देशमुख सांगत आहेत .

ग्रामस्थांसह धनंजय देशमुख यांच्या मागण्या काय?

कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे.

कृष्णा आंधळ्याच्या समर्थक अजूनही त्याचे स्टेटस ठेवतात, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. ते प्राणघात हल्ले करत आहेत. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे.

सरकारी वकिलांची नियुक्ती करावी.

हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात अंडरट्रायल चालायला हवं.

https://www.youtube.com/watch?v=jjbhhhubf_5q

महत्वाच्या बातम्या:

संतोष देशमुख हत्येला 77 दिवस पूर्ण, ग्रामस्थांसह धनंजय देशमुखांचा एल्गार, मस्साजोगच्या अन्नत्याग आंदोलनाच्या मागण्या काय?

अधिक पाहा..

Comments are closed.